जाहिरात-9423439946
दळणवळण

…या तालुक्यात ३२ मनोऱ्यांची उभारणी होणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

अकोले-(प्रतिनिधी)

अकोले तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात नेटवर्क नसल्यामुळे शासकीय काम व विद्यार्थ्यांना समस्या येत होत्या.याची गंभीर दखल घेत खा.सदाशिव लोखंडे यांनी घेत केंद्र सरकारकडून भारत संचार निगम लिमिटेडकडून ३२ टॉवरची मंजुरी घेतली आहे.यामुळे अकोले तालुक्यातील नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

देशभरात वापरकर्त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे,मोबाईल कंपन्यांना त्यांच्या सेवांचा विस्तार करण्यास भाग पाडले गेले आहे आणि निवासी क्षेत्रांचा वापर टॉवर बसवण्यासाठी, चांगल्या सेवा देण्यासाठी उत्सुक आहेत.बहुतेक वेळा,त्यांना दोन कारणांमुळे निवासी भागात त्यांचे पाऊल वाढवण्यास विरोध होत नाही.सर्वप्रथम,मोबाईल कंपन्यांना रहिवाशांकडून टॉवर बसवण्यासाठी सतत पाठिंबा मिळतो असताना अकोले तालुक्यात मात्र डोंगराळ भागामुळे हा विस्तार शक्य झाला नव्हता आता त्याला पाठबळ मिळाले आहे.

परिणामस्वरूप या भागात टॉवर विस्ताराला अकोले तालुक्यात मर्यादा आली होती.परिणाम स्वरूप अकोले तालुक्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यासाठी शिर्डीचे खा.लोखंडे यांनी वाचा फोडली आहे. आदिवासी दुर्गम भागात नेटवर्क नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याची दखल घेत खासदार लोखंडे यांनी मागील हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.

दरम्यान कोरोना महामारीमध्ये ऑनलाइन शिक्षण असल्याने नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.तसेच शासकीय कामकाज करतानाही अनेक समस्या उदभवत होत्या.ही गंभीर बाब लक्षात घेऊन खा.लोखंडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान याची दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनीं गंभीर दखल घेतली असून आदिवासी दुर्गम भागांतील मुथाळणे,पिंपळदरावाडी,जायनावाडी,कोकणवाडी, उंबरेवाडी,पळसुंदे,कळंब,बोरी,मुतखेल,उडदावणे,पांजरे,साम्रद,कोथळे,लव्हाळी,ओतूर,लव्हाळी कोतूळ,वागदरी,पिंपरी,पाचनई,खडकी खुर्द,खडकी बुद्रुक,शिरपुंजे खुर्द,शिरपुंजे बुद्रुक,कुमशेत,शिसवद,आंबित,गोंदुशी,मवेशी,पुरुषवाडी,साकीरवाडी,बारववाडी,बलठण,फोपसंडी या ३२ गावांमध्ये भारत संचार निगम लिमिटेडच्या टॉवरची उभारणी होणार आहे.

यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रश्न निकाली निघणार असल्याने अकोले तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close