गुन्हे विषयक
कुलूप तोडून अडीच लाखांची मोठी चोरी,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात श्रद्धानगरी येथील रहिवासी अक्षय कैलास लोहाडे (वय-२६) यांच्या घरी कोणी नाही हि बाब हेरून अज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व अडीच तोळे सोन्याचे दागिने असा ०२ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लाम्बवला आहे.त्यामुळे कोपरगावात खळबळ उडाली आहे.
अक्षय लोहाडे हे आपल्या घरी नसतांना अज्ञात चोरट्यानी त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांच्या घरी त्यांच्या घरी कोणी नाही हे पाहून त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात हत्याराने तोडून त्यात प्रवेश करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ०२ लाख ४० हजार रुपयांची चोरी केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील श्रध्दानगरी येथील प्राजक्ता प्लाझा येथील रहिवाशी अक्षय लोहाडे हे आपल्या घरी नसतांना अज्ञात चोरट्यानी त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांच्या घरी त्यांच्या घरी कोणी नाही हे पाहून त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात हत्याराने तोडून त्यात प्रवेश करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी २,०००,५००,१००,५०,१० किमतीच्या नोटा,५० हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याची गळ्यातील चैन,७५ हजार रुपये किमतीच्या सहा सोन्याच्या अंगठ्या,असा एकूण ०२ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला आहे.घटनास्थळी श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मदने,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आदिनी भेट दिली आहे.तर अक्षय लोहाडे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.८१२/२०२० भा.द.वि.कलम ४५४,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.