अर्थ विषयक
..या बँक सेवक पतसंस्थेच्या सभासदांना १४ टक्के लाभांश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नागरी सहकारी बँक सेवक पतसंस्थेच्या सभासदांना या वर्षी दीपावलीचा १४ टक्के लाभांश संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी जाहीर केला आहे.त्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव पीपल्स बँक व गौतम सहकारी बँक या दोन सहकारी बँक असून या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या आर्थिक निकड भागविण्यासाठी कोपरगाव तालुका नागरी सहकारी बँक सेवक पतसंस्थेची स्थापना केली आहे.या बँक सेवक पतसंस्थेच्या संचालक मंडळाने या वर्षी आपल्या सभासदांना दीपावलीचा लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.हा लाभांश तब्बल चौदा टक्के आहे-बाळासाहेब जाधव,अध्यक्ष
कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव पीपल्स बँक व गौतम सहकारी बँक या दोन सहकारी बँक असून या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या आर्थिक निकड भागविण्यासाठी कोपरगाव तालुका नागरी सहकारी बँक सेवक पतसंस्थेची स्थापना केली आहे.या बँक सेवक पतसंस्थेच्या संचालक मंडळाने या वर्षी आपल्या सभासदांना दीपावलीचा लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.हा लाभांश तब्बल चौदा टक्के आहे.या लाभांशामुळे सभासदांची दिवाळी गोड होणार आहे.या वर्षी सर्वसाधारण सभा घेण्यासाठी मार्च २०२१ पर्यंत वाढीव मुदत दिली आहे.त्या मुळे नुकत्याच संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे.तर पतसंस्थेच्या सेवकांना २५ टक्के बोनस व सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
या पतसंस्थेचे भाग भागभांडवल ४१.०५ लाख तर २८.०५ लाख कर्जवाटप आहे.गुंतवणूक ३१.०५ लाख तर मार्च अखेर सर्व वजावटी जाता संस्थेला निवळ नफा ६.३१ लाख आहे.संस्थेचा एन.पी.ए. शून्य टक्के आहे हे विशेष ! संस्था आपल्या सभासदांना तीन लाखांपर्यंत कर्ज वाटप करते.
बँके संचालकांच्या या बैठकीस संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव,उपाध्यक्ष राजेंद्र सुपेकर,संचालक बबनराव भागवत,गोकुळ गंगवाल,विरेश पैठणकर,महेंद्र उगले,विश्वनाथ धुळे,सुधाकर नरोडे,सुचेता कदम,शैला लावर,सचिव जितेंद्र छाजेड,प्रदीप मेढे आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेच्या या उपक्रमाचे पीपल्स बँकेचे कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे,गौतम बँकेचे कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड आदींनी कौतुक केले आहे.