जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात लाखाच्या सोयाबीनवर मारला चोरांनी डल्ला !

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शेतातील खोलीत बंद करून ठेवलेल्या सुमारे २५ क्विंटल सोयाबिनवर पाळत ठेऊन अज्ञात चोरट्यानी डल्ला मारल्याचा गुन्हा फिर्यादी शेतकरी विजय जवरीलाल बेदमुथा (वय-४०) रा.गोकुळनगरी कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.या घटनेने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

नुकतीच सोयाबीनची काढणी होऊन त्यांनी ते सुमारे पंचवीस क्विंटल सोयाबीन आपल्या शेतजमिनीतील तीन क्रमांकाच्या खोलीत बंद करून ठेवलेले होते.दिवाळीचा हंगाम असल्याने सर्व जण आपल्या दिवाळीच्या सणात मग्न असल्याने शेतीत कोणाचाही फेरफटका झाला नाही.याच संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यानी या ठिकाणी पाळत ठेवून लंपास केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,विजय बेदमुथा यांची धारणगाव शिवारात स्वतःची शेतजमीन आहे.नुकतीच सोयाबीनची काढणी होऊन त्यांनी ते सुमारे पंचवीस क्विंटल सोयाबीन आपल्या शेतजमिनीतील तीन क्रमांकाच्या खोलीत बंद करून ठेवलेले होते.दिवाळीचा हंगाम असल्याने सर्व जण आपल्या दिवाळीच्या सणात मग्न असल्याने शेतीत कोणाचाही फेरफटका झाला नाही.याच संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यानी या ठिकाणी पाळत ठेवून त्या ठिकाणच्या खोलीत ठेवलेले सोयाबीन दि.सोळा नोव्हेम्बर रोजीच्या सायंकाळी आठ वाजेच्या नंतर व दि.१७ नोव्हेंबरच्या सकाळी ०६ वाजे पूर्वी तीन क्रमांकाच्या खोलीचे कुलूप तोडून ०४ हजार रुपये क्विंटल दराने २५ क्विंटलचे १ लाख रुपयांचे सोयाबीन लबाडीच्या इराद्याने लंपास केले आहे.हि बाब त्यांना आज सकाळी लक्षात आली त्यावेळी उशीर झाला होता.त्यांनी याबाबत आज तातडीने हालचाल करून या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दुपारी दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल कटके,पो.हे.कॉ.एस.डी. पवार आदींनी भेट देऊन घट्नास्थानांची पाहणी केली आहे.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५३९/२०२० भा.द.वि.कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे कॅ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close