जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शेतकऱ्याच्या सोयाबीनची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेले शेतकरी विजय प्रभाकर सांगळे (वय-३२) यांच्या घराच्या ओसरीत तयार सोयाबीन थप्पी लावून ठेवलेली होती व ते थंडीमुळे रात्री घरात झोपी गेले असताना काल रात्रीच्या सुमारास १२ हजार रुपये किमतीच्या चार क्विंटलच्या आठ गोण्या अज्ञात चोरट्यानी लांबवल्या असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे.

वर्तमान काळात सोयाबीनला चांगले दर असल्याने चोरांची वक्रदृष्टी या किमती मालावर गेली असल्यास नवल नाही.कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत पुणतांबा रोडच्या लागत असलेल्या वस्तीवर फिर्यादी शेतकरी विजय सांगळे यांनी आपली सोयाबीन आपल्या ओसरीत थप्पी लावून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यानी त्यावर पाळत ठेऊन रात्रीच्या सुमारास रात्री कधीतरी शेतकऱ्याच्या घरातील सगळे सदस्य झोपी गेल्याची संधी साधून या बारा हजार रुपये किमतीच्या आठ गोण्यावर डल्ला मारला आहे.

वर्तमान काळात सोयाबीन काढणीचा हंगाम असून अनेकांनी आपली सोयाबीन काढून ती आपल्या घरात आणून ठेवली आहे.तर काहींनी घरात जागा नसल्याने शेतात कुठेतरी ती झाकून ठेवलेली आहे.वर्तमान काळात सोयाबीनला चांगले दर असल्याने चोरांची वक्रदृष्टी या किमती मालावर गेली असल्यास नवल नाही.कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत पुणतांबा रोडच्या लागत असलेल्या वस्तीवर फिर्यादी शेतकरी विजय सांगळे यांनी आपली सोयाबीन आपल्या ओसरीत थप्पी लावून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यानी त्यावर पाळत ठेऊन रात्रीच्या दि.०३ ऑक्टोबरच्या सुमारास रात्री कधीतरी शेतकऱ्याच्या घरातील सगळे सदस्य झोपी गेल्याची संधी साधून या बारा हजार रुपये किमतीच्या आठ गोण्यावर डल्ला मारला आहे.हि बाबत शेतकऱ्याच्या सकाळी उठल्यावर लक्षात आली त्यावेळी फार उशीर झालेला होता.चोरट्यानी हा माल घेऊन पोबारा केलेला होता.त्यामुळे या शेतकऱ्याला पच्छाताप करण्याशिवाय हाती काही उरले नाही.त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८११/२०२० भा.द.वि कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री.नाईक दारकुंडे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close