गुन्हे विषयक
पाण्यात बुडुन एकाचा मृत्यू,अकस्मात मृत्यूची नोंद

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत नाटेगाव रस्त्यालगत एका कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात दत्तात्रय उत्तम मोरे (वय-५०) हे दि.०७ नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजेपुर्वी पाण्यात पडून मृत्यू पावले असल्याची धक्कादायक घटना घडली असून या बाबत किसन मच्छिद्र काकडे (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर नोंदवली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,मयत दत्तात्रय मोरे हा मूळ वैजापूर तालुक्यातील रहिवाशी होता व तो उदरनिर्वाहासाठी येसगाव येथील आपल्या मावसभावाकडे आलेला होता.तो बहुदा मासे पकडण्यासाठी या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याकडे गेला असावा व त्याची दुर्घटना घडून त्याचा दुपारी दोन पूर्वी दुर्दवी मृत्यू झाला आहे.त्याच्या पच्छात त्याला सोडून गेलेली पत्नी खेरीज कोणी नाही अशी माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे.या बाबत मयताचा मावसभाऊ किसन काकडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी मयताची आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यु नोंदणी पुस्तक क्रं.५२/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करीत आहेत.