गुन्हे विषयक
आठ लाखांसाठी महिलेचा छळ,सात जणांवर गुन्हा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपल्या माहेराहून आठ लाख रुपये आणावे या साठी तिचा शारीरिक,मानसिक छळ करून तिला आरोपी नवरा सागर भानुदास शेळके,सासरे भानुदास शांताराम शेळके,सासू मंगल भानुदास शेळके भाया अमोल भानुदास शेळके,जावं वंदना अमोल शेळके,नणंद चांदणी ज्ञानेश्वर पाखरे,ननंदयी ज्ञानेशवर पाखरे,आदीं सात जणांनी आपल्याला घरातून बाहेर हाकलून दिले असल्याचा आरोप फिर्याद वृषाली सागर शेळके वय-२६ रा.रांजणगाव शेनपुंजे ता.गंगापूर जि. औरंगाबाद,ह. मु.विश्वनाथ कांबळे यांचे घरी यांनी कोपरगाव शहर पोलिसात दाखल केली आहे.
या जोडप्याचे लग्नानंतर काही दिवस नव्या नवलाईचे नऊ दिवस आनंदात गेले.मात्र सासरच्या माणसांनी आपले रंग दाखविण्यास प्रारंभ केला होता.त्यांनी आपली सून म्हणजेच फिर्यादी महिला वृषाली शेळके हिने आपल्या कोपरगाव तालुक्यातील डाऊच येथील माहेराहून बोलेरो जीप घेण्यासाठी आठ लाख आणावे यासाठी तिचा शारीरिक मानसिक,छळ सुरु केला.तिला मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी करून तिला घराबाहेर काढले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की.फिर्यादी महिलेचे दि.१४ मार्च २०१८ रोजी सागर भानुदास शेळके यांचेशी लग्न झाले होते.लग्नानंतर काही दिवस नव्या नवलाईचे नऊ दिवस आनंदात गेले.मात्र सासरच्या माणसांनी आपले रंग दाखविण्यास प्रारंभ केला होता.त्यांनी आपली सून म्हणजेच फिर्यादी महिला वृषाली शेळके हिने आपल्या कोपरगाव तालुक्यातील डाऊच येथील माहेराहून बोलेरो जीप घेण्यासाठी आठ लाख आणावे यासाठी तिचा शारीरिक मानसिक,छळ सुरु केला.तिला मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी करून तिला घराबाहेर काढले आहे.दरम्यान गुन्हा दाखल करण्यापूर्वी सदर महिलेला नगर येथील दिलासा सेलला अर्ज सादर केला होता.त्याची चौकशी होऊन त्या नंतर हा गुन्हा दाखल केला आहे.मात्र त्यानंतरह दोन्ही गटांना समुदेशक यांनी समुदेशन करूनही उपयोग न झाल्याने अखेर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७८७/२०२० भा.द.वि.कलम ४९८ (अ).३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी नवरा सागर भानुदास शेळके,सासरे भानुदास शांताराम शेळके,सासू मंगल भानुदास शेळके भाया अमोल भानुदास शेळके,जावं वंदना अमोल शेळके,नणंद चांदणी ज्ञानेश्वर पाखरे,ननंदयी ज्ञानेशवर पाखरे,आदीं सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.