कोपरगाव तालुका
ओमनी-दुचाकी अपघातात एक ठार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत पुणतांबा चौफुली ते पुणतांबा रस्त्यावर कोकमठाण हद्दीत कोपरगावच्या दिशेने आपल्या घराकडे येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत कोकमठाण येथील इसम रमेश जगन्नाथ देशमुख (वय-४६) हे गंभीररीत्या जखमी होऊन उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.या बाबत कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दि.१६ ऑक्टोबरच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरी येत असताना त्यांना समोरून कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली.धडक इतकी मोठी होती की दुचाकी स्वार हा जोराने धडकून कारची काच फोडून चालक रमेश देशमुख यांच्यावर जोरात धडकला त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्यातच त्याचे निधन झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवासी असलेले शेतकरी रमेश जगन्नाथ देशमुख हे आपल्या ताब्यातील मारुती ओमनी हि चारचाकी घेऊन दि.१६ ऑक्टोबरच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरी येत असताना त्यांना समोरून कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली.धडक इतकी मोठी होती की दुचाकी स्वार हा जोराने धडकून कारची काच फोडून चालक रमेश देशमुख यांच्यावर जोरात धडकला त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्यांना नजीकच्या नागरिकांना उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात भरती केले होते.तेथे त्यांच्यावर चार दिवस उपचार सुरु होते.मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना वाचविण्यात अपयश आले आहे.त्यांची प्राणज्योत अखेर दि.२१ ऑक्टोबरच्या दिवशी ९.१५ वाजता मालवली आहे.त्यांच्यावर कोकमठाण हद्दीत गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पच्छात सहा भाऊ,पत्नी,दोन मुले.मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू र.क्रं.५२/२०२०/सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.