गुन्हे विषयक
मूर्शतपुरात तीन चोरटे रंगेहात पकडले,गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामपंचायत हद्दीतील गांजेवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास एक टाटा कंपनीची एक जीप गाडी (एम.एच.१७ बी.डी.३८७४) या गाडीच्या सहाय्याने वादळाने वाकलेले व ३० हजार रुपये किमतीचे दोन सौर पॅनल व एक बॅटरी असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेत असताना त्याच गावातील आरोपी दत्तू देवानंद केसकर वय-३८,अशोक उत्तम बोरुडे वय-२० व दीपक शिवाजी काकडे वय-२४ आदी तिघांना ग्रामस्थांनी पकडले आहे.व त्यांना चोप देऊन त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मुर्शतपुर परिसरात खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायतीने आदिवासी वस्तीत उजेडासाठी लावलेले सोलर पॅनल हि वाकले होते हि संधी साधत वरील चोरट्यानी आज पहाटेच्या ३.३० वाजेच्या सुमारास ग्रामस्थ पहाटेच्या गाढ झोपेत असताना बाहेर कोणी नाही हि संधी साधत वरील क्रमांकाच्या जीपचा वापर करत दोन सौर पॅनल व एक बॅटरीचा फडशा पाडला होता.मात्र ग्रामस्थांच्या सजगतेने हि दुर्घटना टळली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,दोन दिवसापूर्वी मुर्शतपुर व चांदगव्हाण परिसरात वादळ झाल्याने या परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहे त्याच बरोबर ग्रामपंचायतीने आदिवासी वस्तीत उजेडासाठी लावलेले सोलर पॅनल हि वाकले होते हि संधी साधत वरील चोरट्यानी आज पहाटेच्या ३.३० वाजेच्या सुमारास ग्रामस्थ पहाटेच्या गाढ झोपेत असताना बाहेर कोणी नाही हि संधी साधत वरील क्रमांकाच्या जीपचा वापर करत दोन सौर पॅनल व एक बॅटरीचा फडशा पाडला होता.मात्र कुत्र्यांनी काहूर उडवल्याने ग्रामस्थ जागे झाले व त्यांनी या वरील तिन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले व ग्रामस्थांनी या चोरट्यांना चांगलेच बदडून काढले व त्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा डाव फसला आहे.दरम्यान या भागात याधीही अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंप व चार चाकी वाहनाच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या आहे त्यांचा तपास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान काही ग्रामस्थांनी याबाबत आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून यात अजून काही चोरटे सामील असल्याची शक्यता बोलून दाखवली आहे.व यातून मोठी टोळी उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दत्तू देवानंद केसकर,अशोक उत्तम बोरुडे व दीपक शिवाजी काकडे आदी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७९०/२०२० भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा ददाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री ससाणे हे करीत आहेत.