जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकाचा खून,तालुक्यात खळबळ,चार जण अटक!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात असलेल्या खडक वसाहत येथील प्लॉट विक्रीचे पैसे मागितल्याचे कारणावरून झालेल्या हाणामारीत अस्लम शहाबुददीन सय्यद (वय- ३५ वर्षे) या तरुणाचा आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजीज शेख,परवीन मुनीर शेख,फिरोज मुनीर शेख,साहील मुनीर शेख सर्व रा.खडक वसाहत डाउच खु.आदीनी खून केला असून त्यांचे  विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी रफीक शहाबुदददीन सय्यद (वय- ४०वर्षे) खुनाचा गुन्हा दाखल झाला असून शहर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

डाऊच खुर्द शिवारात काल १० डिसेंबरच्या रात्री ८.१५ वाजता डाऊच खुर्द शिवारात आपल्या प्लॉट विक्रीची रक्कम मागण्यासाठी गेलेला इसम अस्लम शहाबुददीन सय्यद हा गेला होता.त्यावेळी वरील चार अटक आरोपींनी आधी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून साहील मुनीर शेख याने चाकुने मयत यास मारण्याची धमकी देवून त्याचे छातीवर चाकूचे वार करून ठार मारले आहे.

  कोपरगाव तालुक्यात मागील चार दिवसापूर्वी कोळगाव थडी शिवारात वीस लाखांची घरफोडी झाली असून त्यातील आरोपी सोनार महेश उदवंत हा राजकीय अभय घेऊन फरार झाला असताना व तो अद्याप सापडला नसताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.डाऊच खुर्द शिवारात काल १० डिसेंबरच्या रात्री ८.१५ वाजता डाऊच खुर्द शिवारात आपल्या प्लॉट विक्रीची रक्कम मागण्यासाठी गेलेला इसम अस्लम शहाबुददीन सय्यद हा गेला होता.त्यावेळी वरील चार अटक आरोपींनी आधी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून साहील मुनीर शेख याने चाकुने मयत यास मारण्याची धमकी देवून त्याचे छातीवर ठिकठिकानी डोक्याजवळ,कानाजवळ,चाकु खुपसून तसेच आरोपी मुनीर शेख याने लाकडी दांडक्याने हाणमार करून जिवे ठार मारून टाकले आहे.

मयत तरुण अस्लम शहाबुददीन सय्यद याचे छायाचित्र.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मयत याने आरोपींना तीन आर जमिनीचा भूखंड विकला होता.त्यांचे पैसे आरोपींनी दिले होते.मात्र घरातील मतभेदांमुळे त्याने नंतर जमीन देण्यास नकार दिला होता.व त्याची रक्कम आरोपींना परत दिली होती त्याचे चलचित्रणं केलेलं होते.मात्र आरोपींना झालेल्या व्यवहारास मयताने दिलेला नकार पचवणे अवघड गेल्याने त्यांनी त्याला वारंवार धमकावणे सुरू ठेवले होते.त्यातून काल रात्री ही खुनाची दुर्दैवी घटना घडली आहे.

   दरम्यान ही घटना पाहून तेथील साक्षीदार सोडविण्यासाठी गेले असता त्यास आरोपी फिरोज शेख याने याने विटाने तोंडावर मारून जखमी केले आहे.तसेच आरोपी परवीन शेख याने मयताची पत्नी हीस लाथाबुक्यांनी मारहाण केली व आरोपी मुनीर शेख याने तीस लाकडी दांडक्याने मारहाण केली जखमी केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनास्थळी भेट देताना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार दिसत आहेत.

   दरम्यान त्याला उपचारार्थ संत जनार्दन स्वामी रुग्णालयात भरती केले असता त्यांनी त्यांची रवानगी शिर्डी रुग्णालयात केली होती.त्याठिकाणी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले असल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.

  दरम्यान यातील मयत तरुण अस्लम सय्यद हा व त्याची पत्नी ही अपंग आहे.त्यांचे पश्चात तीन मुले,वडील असा परिवार आहे.आईचे पूर्वीच निधन झालेले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे यांनी व त्यांचे सहकाऱ्यांनी धाव घेऊन आरोपींना अटक केली आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.रं.नं व कलम -1585/2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 103(1),115(2),352,351(2)3(5) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close