गुन्हे विषयक
जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड,२० जणांवर गुन्हा,११ लाखांचा माल जप्त!

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नवीन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नगर जिल्ह्यात नियुक्ती झाल्यानंतर कोपरगाव तालुका पोलिस अधिकारी अंग झटकून कामाला लागले आहे.कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल केलेल्या कारवाईत खिर्डी गणेश शिवारात ‘हॉटेल साईतेज’च्या पाठीमागे असलेल्या कांद्याच्या शेडच्या मागील बाजूस असलेल्या आडोशाला अवैध जुगाराच्या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत मोठा ऐवज जप्त केला असून एकूण २० आरोपीवर गुन्हा दाखल केला असून विविध गाड्या,रोख रक्कम,जुगाराचे साहित्य असा १० लाख ७९ हजार २३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.त्यामुळे कोपरगाव आणि येवला तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी विविध चारचाकी गाड्या,मोटारसायकली,मोबाईल,रोख रक्कम असा १० लाख ७९ हजार २३० रुपयांचा भरभक्कम ऐवज,जुगाराचे साहित्य,चिठ्ठ्या असा माल जप्त केला आहे.त्यामुळे जुगाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षकपदी अहिल्यानगर पोलिसांचे सध्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे राकेश ओला यांच्या जागी नुकतेच बदलून आले आहे.तर ओला यांची बदली मुंबई येथे बदली झाली आहे.सोमनाथ घार्गे हे पूर्वी मुबई येथील महानगरपालिका पोलीस उपअधीक्षक म्हणून काम करत होते त्यांनी यापूर्वी श्रीरामपूर येथेही काम केले आहे.त्यांना या भागाची चांगली माहिती आहे.त्यांनी आल्या-आल्या जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर अंकुश लावण्याचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्यासाठी नियुक्ती केली आहे.त्यामुळे कोपरगावसह जिल्ह्यात यावर अंकुश बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका पोलिस अधिकारी अंग झटकून कामाला लागले आहे.तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल केलेल्या कारवाईत खिर्डी गणेश शिवारात ‘हॉटेल साईतेज’च्या पाठीमागे असलेल्या कांद्याच्या शेडच्या मागील बाजूस असलेल्या आडोशाला अवैध जुगाराच्या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत मोठा ऐवज जप्त केला असून एकूण २० आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान यात आरोपी म्हणुन रविंद्र माधव सानप रा.टाकळी ता.कोपरगाव हा त्याचे स्वतःचे फायदयाकरिता कल्याण मटका नावाचा जुगार हा त्याचे हस्तक बबलु माधव सानप (वय- ४२) रा.ब्रिजलालनगर,कोपरगाव,जनार्धन रामदास खरसे (वय-२८) रा.विंचूर रोड,लक्कडकोट ता.येवला,प्रविण भाऊसाहेब डोख (वय-३२)रा.करंजी ता.कोपरगाव,जितेंद्र बळीराम पहिलवान (वय-५५) रा.येवला यांचेमार्फत खेळविताना व इसम नामे प्रविण दत्तात्रय आहेर (वय-४२) रा.येवला, देवा काशिनाथ पूरे (वय- २२),रा.येवला,युवराज भगवान शिंदे,(वय-३८) रा.पारेगाव ता.येवला,दिलीप चिमाजी गायकवाड (वय-४०)रा.साकुरी,ता.राहाता,जि.अहिल्यानगर,हिरालाल यादव चंद्रा (वय-४३)रा.संजयनगर,कोपरगाव, राजेंद्र गंगाधर सोनगीर (वय- ५८) रा.सावळीविहीर ता.राहाता,मारुती सुखदेव जाधव (वय-५२)रा.ओगदी ता.कोपरगाव,शिवाजी छबु आहेर (वय-५०)रा.आडगाव ता.येवला, संजय पोपट मोरे (वय-४०)रा.पारंगाव ता.येवला,वाल्मीक रंगनाथ पर्वत (वय-५७)रा.काटेगाव,येवला,संतोष चांगदेव साताळकर (वय-४४)रा.नागडे,ता.येवला,प्रविण ठकानी खोकले (वय-३६)रा.आडगाव ता.येवला,विकास एकनाथ घोडेराव (वय-३९)रा.येवला,रविंद्र सुर्यभान उशीर (वय -४५)रा.सायगाव,ता.येवला,बापु अशोक पवार (वय-३४)रा. आडगाव,ता.येवला,जि.नाशिक आदींचा त्यात समावेश आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी विविध चारचाकी गाड्या,मोटारसायकली,मोबाईल,रोख रक्कम असा १० लाख ७९ हजार २३० रुपयांचा भरभक्कम ऐवज,जुगाराचे साहित्य,चिठ्ठ्या असा माल जप्त केला आहे.त्यामुळे जुगाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-२००/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अधिनियम १२(अ) प्रमाणे फिर्यादी पो.कॉ.रमेश यशवंत झाडे यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस ना.एम.ए.वलवे या करीत आहेत.