जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नाजूक कारणावरून दोन गटात मारहाण,पाच जखमी

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत,” तुझ्या वडिलांनी एका नाजूक प्रकरणाचे पत्र पाठवले ते दाखवा;खरोखरच अक्षरे त्यांची आहेत का ? असा जबसाल केला असता त्याचा राग येवून दोन गटात झालेल्या हाणामारीत भारत विठ्ठल गायकवाड,समाधान विठ्ठल गायकवाड,सविता भारत गायकवाड,विमल समाधान गायकवाड आदी चार आरोपी विरुध्द कोपरगाव तालुक्यात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे सांगवी भुसार आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

  

“तुझ्या वडिलांनी कोणाला… काय पत्र पाठवले ते दाखवा;खरोखरच अक्षरे त्यांची आहेत का ? असा जबसाल केला असता त्याचा राग येवून दोन गटात झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले आहे.त्यामुळे सांगवी भुसार परिसरात या प्रकरणी मोठी चर्चा रंगली आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसम व आरोपी भारत विठ्ठल गायकवाड,समाधान विठ्ठल गायकवाड,सविता भारत गायकवाड,विमल समाधान गायकवाड हे एकमेकाचे नातेवाईक असून त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद आहेत.त्यातच काल दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०७.५५ वाजेच्या सुमारास फिर्यादी इसमाने आरोपींना विचारले की,”तुझ्या वडिलांनी कोणाला…काय पत्र पाठवले ते दाखवा;खरोखरच अक्षरे त्यांची आहेत का ? असा जबसाल केला असता त्याचा राग येवून दोन गटात झालेल्या हाणामारीत भारत विठ्ठल गायकवाड,समाधान विठ्ठल गायकवाड,सविता भारत गायकवाड,विमल समाधान गायकवाड आदी चार आरोपी विरुध्द कोपरगाव तालुक्यात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी सविता भारत गायकवाड यांनी आपली दुसरी फिर्याद दाखल केली असून यात त्यांनी आमच्याशी विनाकारण वाद का घालता ? असे विचारले असता आरोपी सुनीता शशिकांत अहिरे,अनिता मिलिंद अडांगळे,सुरेखा बापू गायकवाड,लहानुबाई साहेबराव गायकवाड,साहेबराव महीपत गायकवाड,बापू साहेबराव गायकवाड आदीनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी साहेबराव महिपत गायकवाड,लहानबाई साहेबराव गायकवाड,सुरेखा बापू गायकवाड,सुनीता शशिकांत अहिरे,अनिता मिलिंद अडांगळे आदी पाच जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१),११५(२),३५२,३५१,(२),(३),३,(५) प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.को.संदीप बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close