जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बँक उपव्यवस्थापकास मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील प्रकरणावरून वाद पेटलेला असताना महाराष्ट्र बँकेचे उपव्यवस्थापक अमृतकुमार जयशंकर सिंह (वय -26)रा. बलिया उत्तर प्रदेश यांना आरोपी सोमनाथ सहादू कुऱ्हाडे,सागर सोमनाथ कुऱ्हाडे,सोमनाथ कुऱ्हाडे यांचे दोन नातू आदींनी बँक व्हाउचर मागितल्याच्या कारणावरून घरात घुसून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

  

आरोपी यांनी आपली रोख रक्कम काढणीसाठी चलन मागितले असता त्यांनी,”ते माझे कडे नाही तुम्ही मला डिस्टर्ब करू नका” असे सांगितले होते.त्याचा त्यांना राग आला व आरोपी यांनी आपल्या दुचाकीवर बँक उपव्यवस्थापक अमृतकुमार यांच्या घरी जाऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी इसम हे कोपरगाव शहरातील महाराष्ट्र बँकेचे उप व्यवस्थापक आहेत.ते वर्तमानात साई आनंद अपार्टमेंट मध्ये राहत आहे.ते आपल्या बँकेत दि.03 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान दैंनदिन काम करत असताना त्यांच्याकडे आरोपी सोमनाथ कुऱ्हाडे हे आले व त्यांनी त्यांचेकडे रोख रक्कम काढणीसाठी चलन मागितले असता त्यांनी,”ते माझे कडे नाही तुम्ही मला डिस्टर्ब करू नका” असे सांगितले होते.त्याचा त्यांना राग आला व आरोपी यांनी आपल्या  दुचाकीवर त्यांच्या घरी जाऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.व खोट्या खटले दाखल करण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी बँकेचे उप व्यवस्थापक अमृतकुमार यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-383/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 140(3),333,115(2),351,(1),(2),3(5) प्रमाणे पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदीनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.डी.आर.तिकोने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close