धार्मिक

सोशल मीडिया सेलच्या…या पदाधिकाऱ्यांनी घेतले शुक्राचार्य समाधीचे दर्शन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक तसेच मराठवाडा विभागाचे सोशल मीडिया संयोजक साईनाथ शिरपुरे यांनीं कोपरगाव बेट येथील,’शुक्रतीर्थ’ या ठिकाणी मनोभावे दर्शन घेतले आहे.

कोपरगाव बेट या ठिकाणी प्राचीन शुक्राचार्य मंदिर आहे.त्या ठिकाणी राज्यातून व परप्रांतातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.वर्तमानात या मंदिराची प्रसिद्धी सातासमुद्रापार गेली असून त्याचे प्रत्यंतर नुकतेच गयानाचे राज्यपाल येऊन त्यांनी नुकतेच शुक्राचार्य मंदिरात येऊन शुक्राचार्य समाधीचे दर्शन घेतले असून त्यानंतर या पाहुण्यांनी हजेरी लावली आहे.

कोपरगाव शहराच्या आग्न्येय दिशेस हाकेच्या अंतरावर देवगुरु ब्रहस्पती व दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र कोपरगाव बेट हे पावन क्षेत्र आहे.त्याच ठिकाणी समुद्र मंथनातून मिळालेले रत्न वाटपावरून देव-दानव युद्ध झाले होते.या युद्धात दानवांना जिवंत करण्यात अहंम भूमिका निभणारी शुक्राचार्यांची ‘संजीवनी विद्या’ बहराला आली होती.या ठिकाणी ऐत्याहसिक ब्रहस्पती पुत्र कच व शुक्राचार्य कन्या देवयानी यांची प्रेम कथा फुलली होती.या ठिकाणीच संजीवनी विद्या शुक्राचार्यांकडून कचाने पळवली होती.त्या ठिकाणी अद्यापही संजीवनी विद्या दिलेला संजीवनी पार अस्तित्वात आहे.

कोपरगाव बेट या ठिकाणी प्राचीन शुक्राचार्य मंदिर आहे.त्या ठिकाणी राज्यातून व परप्रांतातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.वर्तमानात या मंदिराची प्रसिद्धी सातासमुद्रापार गेली असून त्याचे प्रत्यंतर नुकतेच गयानाचे राज्यपाल येऊन त्यांनी नुकतेच शुक्राचार्य मंदिरात येऊन शुक्राचार्य समाधीचे दर्शन घेतले असून त्यानंतर या पाहुण्यांनी हजेरी लावली आहे.

दरम्यान त्यानीं या वेळी विधिवत पूजा केली आहे.याप्रसंगी त्यांचा सत्कार करताना दैत्य गुरु शुक्राचार्य बेट देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक तसेच उत्तर महाराष्ट्राचे विभाग संयोजक समीर आंबोरे,सोमनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close