जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नात्यातील इसमांकडून महिलेचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा 

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)   

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादी महिलेने (वय-४३) आपल्या नवऱ्याच्या नात्यातील दोन जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेतील दोन नात्यातील आरोपी यांनी दि.२९ ऑगष्ट रोजी रात्री ०८.४५ वाजता फिर्यादीच्या घराचे फाटक उघडून आत प्रवेश करून फिर्यादी महिलेस वाईटसाईट शिवीगाळ करून एका आरोपीने फिर्यादी महिलेचा साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी व फिर्यादी महिलेचा पती यांच्यात  किरकोळ स्वरूपात वाद आहेत.दरम्यान या घटनेतील दोन नात्यातील आरोपी यांनी दि.२९ ऑगष्ट रोजी रात्री ०८.४५ वाजता फिर्यादीच्या घराचे फाटक उघडून आत प्रवेश करून फिर्यादी महिलेस वाईटसाईट शिवीगाळ करून एका आरोपीने फिर्यादी महिलेचा साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप केला आहे.

   दरम्यान फिर्यादी महिलेच्या पतीने त्यास विरोध केला असता दुसऱ्या आरोपीने त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी  दिली असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिलेने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन आरोपी विरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत महिलेच्या सासरच्या नातेवाईका विरुद्ध गुन्हा क्रं.४१८/२०२३ भा.द.वि.कलम ३५४,४५२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close