जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुकान फोडले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा  

माहेगाव देशमुख-(माणिक उगले)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या लगत विनोद घोगटे यांच्या दुकानाची अज्ञात चोरट्यानी वरील पत्रा कापून आत उतरून १० ते १२ हजार रुपयांच्या विविध मुद्देमालाची चोरी केली असल्याचे उघड झाले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे.त्यामुळे व्यापारी आणि ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान कोळगाव थडी सुरेगाव परिसरात गोदावरी नदीवर नऊ शेती पंपाची मोटार खोलून त्याचा अंतर्गत असलेली तांब्याची वायर अज्ञात चोरट्यानी पळवली असून त्यात काशिनाथ कोळपे,शिवाजी कोळपे,राजेंद्र निबाळकर,शशिकांत शिंदे,मोहमंद शेख,सागर लुटे,बाळासाहेब निबाळकर,नानासाहेब कोळपे,वाल्मीक मुक्ता कोळपे अशा नऊ शेतकऱ्याचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे गत पंधरवाड्यात एका धार्मिक ग्रंथाची विटंबना झाली असताना व त्यातील आरोपी अद्याप निष्पन्न झाला नसताना आता तेथील शेतकरी काशिनाथ रामचंद्र कोळपे यांच्यासह नऊ शेती पंपाची तांब्यांची विद्युत तार चोरीस गेली आहे.त्या घटनेची बातमी प्रसिद्ध होऊन त्या बातमीची शाई वाळत नाही तोच आता सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत किराणा दुकानदारांची चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे.

   सुरेगाव हद्दीत असलेल्या अंबिकानगर परिसरात घराला कुलूप असताना भरदिवसा पाळत ठेऊन ‘गुरुदत्त किराणा अँड जनरल स्टोअर’ या दुकानांची वरील पत्रा कापून चोरी झाली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे सुरेगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान नेहमी होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थानीं केली आहे.

दरम्यान कोळगाव थडी सुरेगाव परिसरात गोदावरी नदीवर नऊ शेती पंपाची मोटार खोलून त्याचा अंतर्गत असलेली तांब्याची वायर अज्ञात चोरट्यानी पळवली असून त्यात काशिनाथ कोळपे,शिवाजी कोळपे,राजेंद्र निबाळकर,शशिकांत शिंदे,मोहमंद शेख,सागर लुटे,बाळासाहेब निबाळकर,नानासाहेब कोळपे,वाल्मीक मुक्ता कोळपे अशा नऊ शेतकऱ्याचा समावेश आहे.


कोपरगाव तालुक्यात दुष्काळाचे सावट पडल्यामुळे सुरेगाव आणि परिसरामध्ये चोरांचे प्रमाण वाढले आहे.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close