जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात महिलेची हत्या की आत्महत्या ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)        

कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील रहिवासी विवाहित महिला संगीताडंपरने दुचाकीस्वारास उडवले,सुदैवाने बचावला,गुन्हा दाखल कृष्णा बागुल (वय-२८) हि घरात मृत स्थितीत आढळून आली असून त्याची दखल तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असली तरी तिच्या अंत्यसमयी तिचा नवरा,सासू सासरा,दिर आदी हजर नसल्याने विविध तर्ककुतर्क व्यक्त होत असून ती हत्या की आत्महत्या याबाबत उक्कडगाव आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या प्रकरणी तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सदर महिलेच्या गळ्यास जखमा असल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे तिने स्वतः आत्महत्या केली की तिचा घात झाला आहे.मात्र दुसरी शक्यता जास्त व्यक्त होत आहे.याबाबत चौकशी करण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मयत विवाहित तरुण महिला संगीता बागुल हि सेंन्ट्रीग काम करणाऱ्या नवऱ्यासह सासू,सासरा,दिर,आदिसंह आपल्या दोन मुलांसह गावाच्या उत्तरेस साधारण एक फर्लांगभर अंतरावर एकत्र राहत होती.मात्र तिचा मृतदेह काल दि.२३ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०६ वाजता घरात आढळून आला होता.तिला घरच्या नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून बाहेर काढले असल्याची माहिती आहे.व त्यानंतर उपचारार्थ वैजापूर येथे नेले होते.मात्र तेथील खाजगी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता.व तिला सरकारी रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला होता.त्यानंतर त्यांनी तिला घरी आणून नंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिला उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकांऱ्यानी तिला मृत घोषित केले होते.तिचे शव विच्छेदन केले असून तिचा अहवाल अद्याप येणे बाकी असतांना व त्याची कोपरगाव तालुका पोलीस वाट पाहत आहे.दरम्यान या बाबत उक्कडगाव आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

उशिराने मिळालेल्या माहिती नुसार आज उशिरा रात्री ८.४० वाजेच्या सुमारास पोलीस अधिकारी घटनास्थळी आले असून पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

सदर उक्कडगाव येथील कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार ती दि.२३ ऑगष्ट रोजी सायंकाळी जेवण झाल्यावर भांडी घासण्यासाठी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती त्या ठिकाणी तिचा पाय घसरून ती पडली असल्याचा दावा केला आहे.मात्र या उलट तिच्या माहेरच्या नातेवाईकांचा दावा आहे.त्यामुळे त्यांनी तिचा अंत्यसंस्कार करण्यास खैरी निमगाव,रुई ता.राहाता येथील नातेवाईकांनी नकार दिला होता.व सदर प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून व चौकशीचा विश्वास देऊन तिच्यावर काल दि.२४ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.मात्र त्या ठिकाणी तिचा नवरा,सासू,सासरे,दिर आदी हजर नव्हते.मात्र त्यांना तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे उक्कडगाव आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती-पत्नीत वाद होते.त्यांना दोन मुले असून त्यातील एकाचे ०७ तर दुसऱ्याचे ०५ वर्ष वय आहे.

दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सदर महिलेच्या गळ्यास जखमा असल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे तिने स्वतः आत्महत्या केली की तिचा घात झाला आहे.मात्र दुसरी शक्यता जास्त व्यक्त होत आहे.याबाबत चौकशी करण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

या प्रकरणी काही नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु असल्याचे समजते.घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस नाईक संतोष लांडे आदींनी भेट दिली आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close