जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘लव्ह जिहाद’ थांबेना,कोपरगावात पुन्हा एक गुन्हा,जिल्ह्यात खळबळ

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात आणि मढी फाटा येथे प्रत्येकी एक प्रकरण प्रकरण उघड झाले असताना शहरात आणखी एक प्रकरण उघड झाले असून यातील मुलगी हि ईशान्य गडावरील महाविद्यालयात शिकत असून ती अल्पवयीन असल्याची माहिती हाती आली आहे.यातील आरोपी हा शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती आहे.त्यास पोलिसांनी नवी मुंबई वाशी येथून अटक केली असून त्याच्या विरुद्ध पोक्सो दाखल केला आहे व त्यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींच्या हाती आली आहे.

“लव्ह जिहाद-प्रेमाचे नाटक-धर्मांतर-बलात्कार-हत्या करण्याची मोहिम देशभरातील काही ‘जिहादी’ परदेशी पैशाच्या बळावर राबवत आहेत.म्हणून कुणावरही विश्वास न ठेवता पालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे असून.आपण सर्वांनीच आपल्या मुली-बहिणी बाबत दक्ष रहाणे गरजेचे आहे.अन्यथा विश्वासघात अटळ आहे.ज्यांना सर्वधर्म समभावाचा फार ‘पुळका’ आहे त्यांनी आधी स्वतःच्या मुलींचे विवाह मुस्लिमांशी लावून द्यावेत किंवा मुस्लिम मुली स्वतःच्या घरात सून म्हणून आणाव्यात,नंतरच सर्वधर्मसमभावाच्या गप्पा माराव्यात”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव शहरात,’लव्ह जिहाद’च्या प्रकार दि.२१ मे रोजी उघड झाला होता.त्यात सदर मुलीवर अत्याचार करण्यासाठी खडकी येथील मदर्शाचा वापर करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली होती.परिणामस्वरूप हिंदू संघटना खडबडून जाग्या झाल्या होत्या.त्यांनी मागील महिन्यात दि.२० जुलै २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सुमारे दिड लाख नागरिक,महिला जमून,’हिंदू जनाक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते.त्यातील एक आरोपी छोटा उर्फ कलीम अद्याप फरार असतांना मढी येथे एक घटना उघड झाली होती.मात्र मुलगी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होती.मात्र त्यात पालकांनी गुपचिळीची भूमिका घेतली होती.त्या घटनेनंतर राहुरी तालुक्यातील लव्ह जिहाद व धर्मपरिवर्तनाची संतप्त घटना उघडकीस आली होती.त्यात राहुरी तालुक्यातील गावची घटना असून यात १० ते १५ अल्पवयीन मुलींना एका शिकवणीची शिक्षिका शिकण्याच्या माध्यमातून इर्फान पठाण नावाच्या माणसाला बोलवून या मुलींना बळजबरीने कुराण वाचायला लावत होती.मुस्लिम समाजाचे सण साजरे करायला लावत होती.मुस्लिम समाजाच्या इतर मुलांना बोलवून फोटो काढत होती.फोटो मॉर्फ करुन ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून मुलींना पळवुन नेण्याचे त्यांचे काळेबेरे करण्याचे काम राजरोस सुरु होतं.त्यानंतर अद्याप या घटना थांबण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे.कोपरगावच्या घटनेची पुनरावृत्ती घडली असून ईशान्य गडावरील महाविद्यालयातील वसतिगृहात राहून मुलगी शिक्षण घेत असताना शेवगाव तालुक्यातील आरोपीने कोपरगावात येऊनया मुलीस फितवले असल्याची बातमी आहे.तिला घेऊन तो अनेक ठिकाणी फिरत होता.तिच्या पालकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दि.०४ ऑगष्ट रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यावर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते.

दरम्यान यातील आरोपी हा तौफिक मिठू पठाण (वय-१९)असे त्याच नाव असून त्यास अटक करून नूकतेच कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय क्रं.०१ समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस दि.१० ऑगष्ट पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान या घटनेने कोपरगाव,शेवगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान यातील मुलगी आणि आरोपी हे दोघे शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती हाती आली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा क्रं.३७२/२०२३ हा भा.द.वि.कलम ३६३ अन्वये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दि.०४ ऑगष्ट रोजी दाखल झाला होता.त्याचा तपास सुरु असताना सदर मुलगी पोलिसांना नवी मुंबई वाशी येथून मिळून आलेली आहे.सदर आरोपीस पकडण्यास कोपरगाव शहर पोलीस अधिकाऱ्यांना तेथील पोलीस अधिकारी निलेश बारसे यांनी मदत केली होती.पुढील तपास पोलीस अधिकारी देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.सी.पवार हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close