जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अपर जिल्हाधिकारी कार्यालय कोपरगावात करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास व या कार्यालयासाठी १३ जून २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मान्यतेनुसार सहा पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात आली असताना आज सदर कार्यालय कोपरगावात शहरात व्हावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी नुकतीच राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे केली आहे.

“वर्तमान कोपरगाव तहसील कार्यालया जवळ पार्किंग साठी मोठी जागा आहे.प्रशासकिय इमारत बस स्थानका पासून पायी पाच मिनीटांचे अंतरावर आहे.दळणवळणासाठी रा.मा.-३५,रा.मा.-६५,राष्ट्रीय महामार्ग-१६१ असून रेल्वे व विमानसेवा देखील उपलब्ध आहे.कोपरगावातील रिक्षा,टॅक्सी,हॉटेल,खानावळ सामान्य माणसाला परवडणाऱ्या आहेत.कर्मचाऱ्यांसाठी घरे व इतर करमणूकीच्या सुविधा,शाळा,महाविद्यालये,दवाखाने,बाजारपेठ उपलब्ध असल्याने कोपरगाव शहर त्यासाठी योग्य आहे”-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते,कोपरगाव.

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास व या कार्यालयासाठी १३ जून २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मान्यतेनुसार सहा पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.ही पदे सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील.यामध्ये एक अपर जिल्हाधिकारी,एक नायब तहसीलदार,एक लघुलेखक,एक अव्वल कारकून,दोन लिपिक- टंकलेखक,अशी पदे असणार आहेत.अ.नगर अपर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रात नेवासा,शेवगाव,पाथर्डी,अ.नगर,पारनेर,श्रीगोंदा,कर्जत,जामखेड असे आठ तालुके राहतील.अपर जिल्हाधिकारी,शिर्डी,यांच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव,राहता,श्रीरामपूर,संगमनेर,अकोले,राहुरी असे एकूण सहा तालुके राहतील अशी घोषणा नुकतीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.त्या पार्श्वभूमीवर हि मागणी पुढे आली आहे.

त्यांनी मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की,”शिर्डी हे पर्यटन व धार्मिक स्थळ निर्माण झालेले आहे.शिर्डी शहरात तरल लोकसंख्या मोठी आहे.शिर्डी शहरात लॉजिंग,बोर्डींग,टॅक्सी,रिक्षा,जेवन,नास्ता,चहा इतर सुविधा अ.नगर जिल्हयातील ह्या वरील सहा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांना परवडणाऱ्या नाही.गर्दीच्या व उत्सव काळात सामान्य नागरिकांना शिर्डी परवडणारी नाही.तेथे शासकीय कार्यालये उपलब्ध नाही.वर्तमान स्थितीत प्रांत कार्यालयास मोठे मासिक भाडे द्यावे लागत आहे.उलट कोपरगावात महसुल विभागाची इमारतीचा वरील मजला रिकामा आहे.त्याचा फायदा या कार्यलयास करून घेता येणार आहे.त्यामुळे मासिक भाडे खर्चात बचत होऊ शकणार आहे.
वर्तमान कोपरगाव तहसील कार्यालया जवळ पार्किंग साठी मोठी जागा आहे.प्रशासकिय इमारत बस स्थानका पासून पायी पाच मिनीटांचे अंतरावर आहे.दळणवळणासाठी रा.मा.-३५,रा.मा.-६५,राष्ट्रीय महामार्ग-१६१ असून रेल्वे व विमानसेवा देखील उपलब्ध आहे.कोपरगावातील रिक्षा,टॅक्सी,हॉटेल,खानावळ सामान्य माणसाला परवडणाऱ्या आहेत.कर्मचाऱ्यांसाठी घरे व इतर करमणूकीच्या सुविधा,शाळा,महाविद्यालये,दवाखाने,बाजारपेठ उपलब्ध आहे.
तरीही शासनाने हा आपला अट्टाहास थांबवावा.याबाबत धार्मिक व पर्यटन,तसेच तरल लोकसंख्या जास्त असलेल्या महागड्या शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला माझा विरोध असून प्रसंगी जनहितासाठी आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार असल्याचा इशारा शेवटी संजय काळे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close