जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

समृद्धी वर अपघात,तीन ठार,सहा जखमी,कोपरगावात चालकावर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर कोकमठाण शिवारात आज मध्यरात्री ०१ वाजेच्या सुमारास आयशर टेंपोला (क्रं.एम.एच.२० सी.टी.६६५६) पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या क्रूझर जीपने (क्रं.एम.एच.२२एच.२५२३) जोरदार धडक दिल्याने त्यातील इसम संतोष अशोक राठोड,(वय-३५)वर्षा संतोष राठोड (वय-३५)अवणी संतोष राठोड (वय-१८ महिने) असे तीन जण ठार झाले असून या अपघातात अन्य ०६ जण गंभीर जखमी झाले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातग्रस्त क्रूझरचे छायाचित्र.

समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे ‘महामार्ग संमोहनाचे’ बळी ठरले असून अपघाताच्या काही सेंकंद आदी त्याच्या मेंदूने व शरीराने जी हालचाल किंवा क्रिया करायला हवी ती वेळेत न केल्याने अपघात झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे.मात्र प्रतिबंधात्मक कारवाई काय झाली हे समजायला मार्ग नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची संख्या देखील वाढली आहे.समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे.गत महिन्यात दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून यात इगतपुरी पर्यंत सदर महामार्ग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरु करण्यात आला आहे.मात्र,सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.सरकारने प्रतिबंधात्मक उपाय करण्याची घोषणा करूनही काहीही उपयोग झाल्याचे दिसत नाही.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत घडली असून यात वरील क्रमांकाची एक क्रूझर जीप हि रात्री ०१ वाजेच्या सुमारास आपल्या प्रवाशांना घेऊन जालन्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जात होती.त्यावेळी ती कोकमठाण शिवारात आली असता ती समोर चाललेल्या वरील क्रमांकाच्या आयशर टेंपोवर जोरात धडकली असून त्यात संतोष अशोक राठोड,(वय-३५)वर्षा संतोष राठोड (वय-३५)अवणी संतोष राठोड (वय-१८ महिने) असे तीन जण ठार झाले असून या अपघातात शरद शिवाजी पवार (वय-३६)रा.ककडा,भानू नाईक तांडा पो.नेर जि.जालना,एजाज सिराज पठाण (वय-२४)रा.लोणार,जि.जालना,बलीबाई अशोक राठोड (वय-५०)रा.कृष्णा अशोकराव राठोड (वय-२७),कोमल कृष्णा राठोड (वय-१९) तिन्ही रा.गोसावी पांगरी,ता.मंठा,नितीन राम पवार (वय-२८)रा.मंठा,आदी ०६ जण गंभीर जखमी झाले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ज्या आयशरला धडक दिली त्याचे छायाचित्र.

या प्रकरणी खबर कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याना उपचारार्थ कोपरगाव नजीक असलेल्या आत्मा मालिक रुग्णालयात भरती केले आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी पांडुरंग राजू पवार (वय-२९)चालक रा.पिंप्री राजा ता.संभाजीनगर यांनी क्रूझरचा आरोपी चालक रणजित तुकाराम राठोड वय-३२रा.महोदरी,ता.मंठा जि.जालना याचे विरुद्ध आपल्या ताब्यातील वाहन हयगईने,अविचाराने चालवून रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून चालविले बाबत गुन्हा क्रं.३११/२०२३ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close