गुन्हे विषयक
‘त्या’ खुनातील दोन आरोपी जेरबंद,एक अद्याप फरार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-नागपूर महामार्गावर असलेल्या दहिगाव बोलका नजीक रेल्वे उड्डाण पुलानजीक असलेल्या संवत्सर शिवारात असलेल्या गुरुराज एच.पी.पेट्रोल पंपावर व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या भोजराज बापूराव घनघाव (वय-४०) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आदित्य गंगाधर रूचके यासह दोन जणांना कोपरगाव शहर पोलिसांनी आज पहाटे शिर्डी आणि नाशिक येथून जेरबंद केले असून अन्य एक जण फरार झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याचा शोध पोलीस घेत आहे.मात्र पोलिसांनी त्यास अधिकृत दुजोरा दिला नाही.
दरम्यान आज सायंकाळी कोपरगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या,’कर्त्यव्य’या त्यांच्या पाच वर्षातील विकास कामांचे पुस्तक प्रकाशनासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे राधाकृष्ण विखे हे येत आहे.त्यांच्या जिल्ह्यात विशेषतः कोपरगाव शहर आणि तालुक्यात वाढलेल्या चारचाकी-दुचाकी गुन्हे व अन्य गंभीर गुन्हेगारी बाबत काय चर्चा होणार याकडे शहर आणि तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-नागपूर महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असलेल्या गुरुराज एच.पी.पेट्रोल पंप असून त्याचे अवघ्या पंधरा दिवसापासूर्वी उदघाटन झाले हॊते.त्यावर मयत इसम भोजराज घनघाव हे व्यवस्थापक म्हणून रुजू झाले होते.दरम्यान दि.२९ जून रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास एका बजाज पल्सर या दुचाकीवरून (क्रं.एच.एच.१७ सी.डब्ल्यू.९१०४) तीन आरोपी त्या ठिकाणी खाली उतरले होते.त्यांचे पैंकी एकाचे अंगात चॉकलेटी व लाल पांढ-या रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेले होते.लाल पांढरे रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेला इसम फिर्यादिकडे येवुन त्याने फिर्यादिस धक्काबुक्की करुन फिर्यादि अमोल धोंडीराम मोहिते (वय-२५) या कामगारांच्या कानाखाली मारली होती हि बाब व्यवस्थापक भोजराज बापुराव घनघाव (मयत) यांनी आपल्या केबिनमधून पाहिली होती.त्यांनी या भांडणात येवुन फिर्यादिस मारहाण करणारे अनोळखी इसमांस,”तु माझे माणसाला मारहाण का केली ? असा जाबसाल केला होता.त्याचा त्याला त्याचा राग आल्याने व राखाडी रंगाचे शर्ट घातलेला इसम व चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने,”त्यांस मारुन टाक सोडु नको” असे म्हणाले तेव्हा पांढरे व लाल रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेला त्या अनोळखी इसमाने त्याचे कमरे जवळुन धारदार चाकु काढुन व्यवस्थापक भोजराज घनघाव,रा.दहेगाव बोलका यांची गंचाडी धरुन चाकुने त्यांचे पोटात व खांदयावर वार करुन त्यांस जिवे ठार मारले होते.
दरम्यान सदर घटना कोपरगाव शहर पोलिसांना कळाल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांनी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी त्याकडे धाव घेतली होती.व त्या आरोपींचा शोध सुरु केला होता.त्या चलचित्रण उपलब्ध झाले होते.मात्र त्यात आरोपींच्या छबी स्पष्ट नसल्याने पोलिसांपुढे आरोपीना शोधण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३१०/२०२३ भा.द.वि.कलम ३०२,३४ प्रमाणे अज्ञात तीन आरोपी विरुद्ध मध्यरात्री १२.०५ वाजता फिर्यादी अमोल धोंडीराम मोहिते या जखमीच्या फिर्यादीच्या जबाबावरून दाखल केला होता.
दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली होती.व आरोपींचा शोध सुरु केला होता.दरम्यान गुप्त खबरी नुसार पोलिसांनी शिर्डी व नाशिक येथील संशयित ठिकाणी धाडी टाकल्या असता त्यातील आदित्य रूचके यासह दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.दुसऱ्या आरोपीचे नाव समजले नाही.तर अन्य एक जण पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी आला आहे.दरम्यान त्याला लवकरच बेड्या ठोकल्या जातील असा आशावाद नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान यातील याच आरोपीनी आधी समोर असलेल्या हॉटेल मधील दशरथवाडी संवत्सर येथील इसम संतोष सजन मोरे यास किरकोळ कारणावरून मारहाण करून जखमी केले होते.त्याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही मात्र तो स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यासह दहिगाव बोलका आणि संवत्सर शिवारात खळबळ उडाली आहे.