अर्थ विषयक
कोपरगावच्या…या बँकेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची स्थापना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नवीन आलेल्या आरबीआय च्या नियमानुसार शंभर कोटींच्या वर ठेवी असणाऱ्या सर्व अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना तज्ञ सदस्यांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहे.त्यानुसार नुकतीच कोपरगाव पीपल्स बँकेने तज्ञ सदस्यांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट समितीची स्थापना केली आहे.या समितीमध्ये आर.बी.आय.च्या निर्देशानुसार काही सदस्य सध्याच्या संचालक मंडळ मधून तर काही सदस्य संचालक मंडळाच्या बाहेरील घेण्यात आलेले आहे.
त्यात बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यपदी कैलासशेठ ठोळे (संचालक सदस्य ),डॉ.विजय कोठारी (संचालक सदस्य),सुनिल कंगले (संचालक सदस्य),संदीप रोहमारे (कृषी क्षेत्र),सी.ए.अभिमन्यू पिंपळवाडकर ( अकाउंट क्षेत्र),धनंजय शेळके (सामाजिक क्षेत्र),विजय नायडू (कॉम्प्युटर क्षेत्र) सहा एप्रिल रोजी सर्व नूतन सदस्यांचा बँकेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला आहे.सदर प्रसंगी बँकेचे जनरल मॅनेजर श्री एकबोटे यांनी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बद्दल माहिती दिली आहे.
बँकेचे चेअरमन सत्यम मुंदडा यांनी या सर्व तज्ञ संचालकांचा बँकेस निश्चित फायदा होईल अशी आशा व्यक्त केली आहे.सर्व नूतन सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.माजी चेअरमन अतुल काले यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी अशोकजी रोहमारे,बँकेचे व्हाईस चेअरमन प्रतिभा शिलेदार,संचालक कल्पेश शहा,अड्.संजय भोकरे,सुनील बंब,हेमंत बोरावके,अतुल काले,धरमभाऊ बागरेचा,रवींद्र ठोळे, प्रभावती पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.