अर्थ विषयक
ग्राहकांनी बँक सेवेचा फायदा घ्यावा-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
श्रीरामपुर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून बॅंकेने ग्राहकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज सुवीधा उपलब्ध करून दिल्या असून ग्राहकांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र बेलापूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक मनीष सिन्हा यांनी नुकतेच एका प्रसंगी केले आहे.
महाराष्ट्र बँकेचा नुकताच वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी ग्राहक सेवेबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी शालिनी तिवारी,किशोर कुलकर्णी,दत्तात्रय काशीद,पंढरीनाथ लंगोटे बँकेने ग्राहकांसाठी ७.४० टक्क्यांनी सोने कर्ज,७.०५ टक्क्यांनी गृह कर्ज,७.४५ टक्क्यांनी वाहन कर्ज या व्यतिरिक्त शेतकरी व व्यापारी यांचेसाठीही विविध कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.