आरोग्य
आठ दिवस घराबाहेर पडू नका-या नेत्याचे आवाहन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात सर्वत्र जमावबंदी कलम लागू केलेले असूनही नागरिक निष्काळजीपणे फिरतांना दिसत असून हे धोकादायक आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.निदान आठ दिवस तरी आपण सर्वांनी देशहितासाठी हा निर्णय घेणे गरजेचे आहे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतेच केले आहे.
जगभर कोरोना या विषाणूने कहर केला आहे.इटलीत प्रतिदिन सात-आठशे माणसे मरत असून अमेरिकेसारख्या प्रगत देशातही हा काही ४ हजार ८०० च्या घरात गेला आहे.जगातील बहुतांशी देश या विषाणूच्या विळख्यात सापडे आहे.इटलीच्या अध्यक्षांवर रडण्याची दुर्दवी वेळ आली आहे.त्यांनी तर आपणाला या संकटातून केवळ एक ईश्वरच वाचवू शकतो इतकी अगतिकता दाखवून या धोक्याची जाणीव करून दिली आहे.
जगभर कोरोना या विषाणूने कहर केला आहे.इटलीत प्रतिदिन सात-आठशे माणसे मरत असून अमेरिकेसारख्या प्रगत देशातही हा काही ४ हजार ८०० च्या घरात गेला आहे.जगातील बहुतांशी देश या विषाणूच्या विळख्यात सापडे आहे.इटलीच्या अध्यक्षांवर रडण्याची दुर्दवी वेळ आली आहे.त्यांनी तर आपणाला या संकटातून केवळ एक ईश्वरच वाचवू शकतो इतकी अगतिकता दाखवून या धोक्याची जाणीव करून दिली आहे व प्रगत राष्ट्राच्या वाट्याला अशी अवस्था आली आहे.त्या तुलनेने आपण विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असताना या विषाणूंचा निष्काळजीपणा आपणाला किंमत चुकविण्यास भाग पाडू शकतो.कारण कोपरगाव शहरात त्या तुलनेने जागरूकता कमी दिसत असून नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही त्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एक परसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि,”नागरिकांनी अत्यंत महत्वाचे कारण असेल तरच स्वतःच्या घराबाहेर आले पाहिजे पण दुर्दैवाने काही नागरिक बाहेर पडून शहरात गर्दी करून कोरोनाचा धोका वाढवित आहेत.जागतिक आकडेवारी बघितली तर भारतास येत्या ८-१५ दिवसांत फार मोठा धोका होऊ शकतो.खरे तर आपण सगळ्यांनीच कठोरपणे स्वतःसाठी किमान ८ दिवसांची “संचारबंदी” लागू करून घेतली पाहिजे व आपण ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो तेथील सर्वच नागरीकांना भेटून कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी ८ दिवस घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन-आग्रह करणे सर्वांच्या हिताचे होईल.अन्यथा फारच गंभीर परिस्थिती येऊ शकते.आपल्या मनाला पटो न पटो पण समाज स्वास्थ्यासाठी आपण आपलीच संचारबंदी लागू करून सर्वांवर आलेल्या संकटावर एकजुटीने मात केली पाहिजे.कृपया हा विषय गांभीर्याने घेऊन आतापासूनच कुणीही आठ दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहनही अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.