जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेती पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करा-नितीन शिंदे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा महावितरण कंपनीने खंडित केलेला विद्युत पुरवठा सत्वर सुरु करावा अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडॆ नुकतीच केली आहे.

या आधी सरकारने वीज बिले शेतकऱ्यांना माफ केली आहेत.त्या वेळी दिवसाकाठी चोवीस तासांपैकी केवळ आठ तास दिवसाला वीज दिलेली आहे.त्यावेळच्या वीज माफीने चोवीस तास गृहीत धरून दिलेली आहे.त्या मुळे त्या वेळच्या कर्जमाफीची रक्कम सरकारकडे आगाऊ जमा झालेली आहे.व तसे ते शेतकरी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात सप्रमाण सिद्ध केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीकडे येणे निघत असल्याने शेतकऱ्यांची सरकारकडे येणे बाकी आहे-नितीन शिंदे

शेतकरी हा देशाचा कणा आहे.शेतकऱ्याला शेती परवडत नसताना तरीही तो जग आणि देशाला वाचविण्यासाठी आपले जीवन देशवासीयांसाठी वेचत असतो.त्यातच राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना व नागरिकांना शंभर युनिट पर्यंत वीज माफी करणार असल्याची चर्चा सुरु केली.व त्याचा थोड्याच दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.मात्र अद्याप तसा निर्णय मात्र घेतला नाही.या आधी सरकारने वीज बिले शेतकऱ्यांना माफ केली आहेत.त्या वेळी दिवसाकाठी चोवीस तासांपैकी केवळ आठ तास दिवसाला वीज दिलेली आहे.त्यावेळच्या वीज माफीने चोवीस तास गृहीत धरून दिलेली आहे.त्या मुळे त्या वेळच्या कर्जमाफीची रक्कम सरकारकडे आगाऊ जमा झालेली आहे.व तसे ते शेतकरी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात सप्रमाण सिद्ध केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीकडे येणे निघत असल्याने शेतकऱ्यांची सरकारकडे येणे बाकी आहे.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी तसे सार्वोच्च न्यायालयात सिद्ध केलेले आहे.त्यामुळे महावीतरणकडेच शेतकऱ्यांचे येणे बाकी असल्याने शेतकऱ्यांच्या विजजोडण्या अनधिकृत खंडित करू नये. असे आवाहनही नितीन शिंदे यांनी शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी सुनील साळुंके,राहुल गवळी,शब्बीर शेख,विष्णू पाडेकर.राजेंद्र औताडे,चंद्रहार जगताप, साईनाथ बोरावके,यादव त्रिभुवन,बबलू जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close