आरोग्य
डाऊच बुद्रुक येथे कोरोना बाबत जनजागृती संपन्न

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाउच बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत हरभरा पिकाच्या आरोग्याबरोबरच कोरोणा आजाराविषयी घ्यावयाची काळजी यावर जनजागृती कार्यक्रम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
यावेळी डाऊच बुद्रुक शेतकऱ्यांबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने हरभरा पिकाचे पिक उत्पादन खर्च विषयी अभ्यास घेण्यात आला व शेतकऱ्यांनी सध्या नैसर्गिक आपत्ती बरोबरच करोणा आजारा विषयी जनजागृती कार्यक्रम पार पडला याप्रसंगी श्री बर्डे कृषी अधिकारी यवतमाळ,एस.बी.मोघे,श्री फुलजिरे, निलेश बीबवे, पन्नालाल दहे, विठोबा बडे, शिवाजी बडे, बाळासाहेब दहे, सुशांत होन, अमोल होन, जालिंदर होन, आदीं प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीशाळा मुरघास तंत्रज्ञान मुक्त गोठा पद्धती कांदा चाळ आदी बाबींची माहिती दिली गावातील ग्रामस्थांनी या शेतकऱ्यांचे स्वागत केले. या उपक्रमास तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मनोज सोनवणे,कृषी पर्यवेक्षक सी.बी. डरांगे, सरपंच केशव ढमाले आदींचे सहकार्य लाभले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. उपस्थित मान्यवरांचे विठोबा बडे यांनी आभार मानले.