जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना मुळे मुलांचे मानसिक स्वास्थ बिघडले-डाॕ.शिरसाठ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील राहून संसर्ग बधितांवर शास्त्रीय उपचार करून कोरोनाला हरवू असे आवाहन बालरोगतज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ यांनी कोपरगावातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोरोनामुळे शाळा बंद आहेत त्यामुळे लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून शालेय पातळीवर त्यांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे त्या प्रयत्नातुन या लहान मुलांचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर परत आणता येईल”-डॉ.उज्वला शिरसाठ

कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात १४ सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला.वर्तमानात लहान मुलांमध्ये होणारा हा शाळा बंद असताना कोरोनासंसर्ग हा चिंतेचा विषय बनला आहे.लहान मुले या साथीचे बळी पडले तर मोठा अनर्थ होऊ शकतो म्हणून याबाबत जनजागृती करण्यात आली.त्यासाठी डॉ.शिरसाठ यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,डी.व्ही. तुपसैंदर,ई.एल.जाधव,ए.के.काले,ए.बी.अमृतकर,एन.के.बडजाते,एस.एन.शिरसाळे,ए.जे.कोताडे,आदि शिक्षक-शिक्षिका,विदयार्थी-पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना म्हणाल्या की,”कोरोनामुळे शाळा बंद आहेत त्यामुळे लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून शालेय पातळीवर त्यांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे त्या प्रयत्नातुन या लहान मुलांचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर परत आणता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी चलचित्रफीतीचा वापर करून विद्यार्थ्यांना त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
प्रारंभी राष्ट्रीय हिंदि दिवस निमित्तानं मुन्सी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पुजन डाॕ.उज्वला शिरसाठ-ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर आभार विदयालयांचे पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close