गुन्हे विषयक
अडीच लाखांसाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथील माहेर व सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील सासर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून फोटोग्राफीचे दुकान टाकण्यासाठी ०२ लाख ५० हजार रुपये आणावे या साठी आपला आरोपी नवरा हर्षल मधुकर बैरागी,सासू मीनाक्षी मधुकर बैरागी,दीर निखिल मधुकर बैरागी, सर्व रा.हनुमान मंदिर बैरागी गल्ली नायगाव ता.सिन्नर यांनी आपला शारीरिक व मानसिक छळ केला असल्याबाबत फिर्यादी महिला रुपाली हर्षद बैरागी (वय-३२) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला रुपाली बैरागी हिचे लग्न सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील हर्षल बैरागी याचे बरोबर दि.१२ फेब्रुवारी २०१८ रोजी मोठ्या डामडौलात संपन्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या सासरच्या मंडळींनी आपले रंग अवघ्या एक महिन्यानंतर दाखविण्यास प्रारंभ केला व या नवविवाहित महिलेने आपल्या माहेराहून फोटोग्राफीचे दुकान टाकण्यासाठी ०२ लाख ५० हजार रुपये आणावे या साठी तिचा शारीरिक मानसिक छळ सुरु केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथील माहेर असलेली फिर्यादी महिला रुपाली बैरागी हिचे लग्न सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील हर्षल बैरागी याचे बरोबर दि.१२ फेब्रुवारी २०१८ रोजी मोठ्या डामडौलात संपन्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या सासरच्या मंडळींनी आपले रंग अवघ्या एक महिन्यानंतर दाखविण्यास प्रारंभ केला व या नवविवाहित महिलेने आपल्या माहेराहून फोटोग्राफीचे दुकान टाकण्यासाठी ०२ लाख ५० हजार रुपये आणावे या साठी तिचा शारीरिक मानसिक छळ सुरु केला व तिला शिवीगाळ सुरु करून उपाशी पोटी ठेऊन लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास प्रारंभ केला.यात आरोपी नवरा हर्षल मधुकर बैरागी,सासू मीनाक्षी मधुकर बैरागी,दीर निखिल मधुकर बैरागी सर्व रा.हनुमान मंदिर बैरागी गल्ली नायगाव ता.सिन्नर आदींचा समावेश आहे.यात दि.०१ जानेवारी २०२१ रोजी शेवटची घटना असून त्या दिवशी फिर्यादीला तिच्या दोन मुलांसह सासरहून हाकलून दिले आहे.तिने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक जाधव पो.हे.कॉ.आंधळे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३३६/२०२१ भा.द.वि.कलम ४९८(अ),३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ.आंधळे हे करीत आहेत.