आरोग्य
मुलबाळ होत नसल्याने महिलेला घरातून हुसकावले,सात जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील घरी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या महिलेला सासरच्या मंडळींनी मुलबाळ होत नाही तसेच लग्नात कबुल केलेले काही एक दिले नाही म्हणून घाण घाण शिवीगाळ करून तिला हुसकावून दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी प्रमाणे आरोपी हरी तुळशीराम बर्डे,तुळशीराम ठकाजी बर्डे,लिलाबाई तुळशीराम बर्डे,शुक्लेश्वर तुळशीराम बर्डे,अलका तुळशीराम बर्डे,छाया दिलीप बर्डे,सागर दिलीप बर्डे,आदी सात आरोपी विरुद्ध फिर्यादी राधा हरी बर्डे (वय-३५) या महिलेने गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेचे घारी येथील तरुण हरी तुळशीराम बर्डे यांचेशी लग्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून खटके उडू लागले होते.त्याचे पर्यावसान वाढत जाऊन अखेर ०८ जानेवारी २०२० रोजी टोकाचे भांडण झाले आहे.त्यात आरोपीनीं तिला माहेराहून लग्नात काबुल केलेले दिले नाही,”तुला मुलबाळ होत नाही”असे म्हणून तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला राधा बर्डे हिचा दि.१५ जून २०११ रोजी घारी येथील तरुण हरी तुळशीराम बर्डे यांचेशी लग्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून खटके उडू लागले होते.त्याचे पर्यावसान वाढत जाऊन अखेर ०८ जानेवारी २०२० रोजी टोकाचे भांडण झाले आहे.त्यात आरोपी हरी तुळशीराम बर्डे,तुळशीराम ठकाजी बर्डे,लिलाबाई तुळशीराम बर्डे,शुक्लेश्वर तुळशीराम बर्डे,अलका तुळशीराम बर्डे,छाया दिलीप बर्डे,सागर दिलीप बर्डे आदी आरोपीनी या महिलेने तिच्या माहेराहून लग्नात काबुल केलेले काही-बाही दिले नाही यावरून भांडण झाले असून त्यांनी,”तुला मुलबाळ होत नाही”.असे म्हणून तिला छळविण्यास प्रारंभ केला होता.अखेर तिला शिवीगाळ करून मारहाण करून,”तू परत घरी यायचे नाही” म्हणून घरातून हाकलून दिले आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलेने भरोसा सेल नगर येथे अर्ज देऊन न्याय मागितला होता.मात्र तरीही आरोपींनीं तिला सासरी नांदविण्यास नेले नाही म्हणून अखेर तिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी गु.र.क्रं.३२८/२०२१ भा.द.वि.कलम ४९८,(अ),३२३,५०४,५०६ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस नियरक्षक दौलतराव जाधव यांचे मारदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.