जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

वीर सैनिकांच्या समर्थनार्थ,कोपरगावात’गौरव फेरी’ संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर स्वतःच्या जीवाची बाजी लावून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या बलिदानाला सलाम करण्यासाठी त्याच प्रमाणे माजी सैनिक,वीर पत्नी,वीर माता यांच्या सन्मानार्थ कोपरगाव प्रशासन,माजी सैनिक संघटना व साईसेवा भक्त मंडळाच्या वतीने आज शहरातून “वीरांना वंदन,मातीला नमन” भव्य “गौरव फेरीचे” मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.त्यास नागरिकांसह माजी सैनिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर आयोजित विविध उपक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाला नूकतीच सुरुवात झाली आहे.या उपक्रमांतर्गत शिलाफलक,वसुधावंदन अंतर्गत ७५ देशी वृक्षांची लागवड करून नगरपरिषदेच्या परिसरात ध्वजारोहण,स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन आदी उपक्रमाचीही सुरुवात झाली असून कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आज माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला असताना आज सकाळी साई सेवा मित्र मंडळ व माहिती अधिकार संजय काळे व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन एका फेरीचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते.

कोपरगावात या ‘गौरव फेरी’चे पुष्पवृष्टी करत फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातील विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.भारत माता की जय,’वंदे मातरम’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.सदर फेरीत बहुसंख्य विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदर ‘गौरव फेरी’ची सुरवात शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणा पासून झाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,वीर सावरकर चौक,एस.जी.विद्यालय छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गे जात सदर रॅलीची सांगता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी झाली आहे.

यावेळी कोपरगांव तालुक्यातील दहेगाव येथील शहिद जवान सुभेदार सुनिल रावसाहेब वलटे,मुर्शतपुर येथील हवालदार अमोल माधवराव जाधव,कोळपेवाडी येथील हवालदार दिपक कृष्णा आहेर,ओगदी येथील नायक पुंजाहरी चांगदेव भालेराव,भोजडे येथील शिपाई बाळू नाना पगारे यांना मानवंदना देत त्याच्या परिवारातील वीर माता,वीर पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांचा शाल,सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ व झाडाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला आहे.

या फेरीत माजी आमदार,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले,नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी,गटविकास अधिकारी सचिन सुरवंशी,गटशिक्षणाधिकारी,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,अधिकारी नगरपालिका कर्मचारी,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी नगरसेवक,शहरा सह तालुक्यातील,विविध शाळा महाविद्यालयाचे शिक्षक,विद्यार्थी,सैनिक स्कुलचे विद्यार्थी,माजी सैनिक संघटना,साई सेवा भक्त मंडळासह शहरातील विविध संघटना नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close