जाहिरात-9423439946
निवडणूक

संवत्सर ग्रा.पं.च्या सरपंचपदी सौ.ढेपले तर उपसरपंचदी परजणे बिनविरोध

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुलोचना दिलीप ढेपले यांची तर उपसरपंचपदी विवेक कृष्णराव परजणे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.के.भावसार यांनी दिली आहे.

निवडून आलेल्या १४ सदस्यांपैकी सरपंचपदासाठी सुलोचना ढेपले यांनी तर उपसरपंचपदासाठी विवेक परजणे यांनी अर्ज दाखल केले होते.तर विरोधी गटाकडून सरपंचपदासाठी कल्याणी भाकरे तर उपसरपंचपदासाठी महेश परजणे यांनी अर्ज दाखल केले होते.विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

आज रोजी संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून
आलेल्या १४ सदस्यांपैकी सरपंचपदासाठी सुलोचना ढेपले यांनी तर उपसरपंचपदासाठी विवेक परजणे यांनी अर्ज दाखल केले होते.तर विरोधी गटाकडून सरपंचपदासाठी कल्याणी भाकरे तर उपसरपंचपदासाठी महेश परजणे यांनी अर्ज दाखल केले होते.मात्र संख्याबळ विचारात घेता कल्याणी भाकरे व महेश परजणे यांनी आपले अर्ज मागे घेतले.त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री भावसार
यांनी सौ.ढेपले व विवेक परजणे यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर केली आहे.यावेळी
सरपंचपदाची सूचना विवेक परजणे यांनी मांडली तर उपसरपंचदासाठी सदस्य राजेंद्र निकम यांनी
सूचना मांडली.या सूचनांना सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार
पडण्यासाठी ग्रामविकास अधिकारी कृष्णा आहिरे यांनी या कामी सहकार्य केले.
या प्रसंगी राजेश परजणे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना नामदेवराव परजणे यांच्या आदर्शाचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. गांव हा आपलाच परिवार समजून कोणतेही मतभेद न ठेवता नवीन पदाधिका-्यांनी कामाला सुरुवात करावी असे आवाहनही केले.गांवाच्या विकासासाठी शासनाच्या
योजना राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही श्री परजणे यांनी सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच केशवराव भाकरे भरतराव बोरनारे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव
साबळे,चंद्रकांत लोखंडे,खंडू पा. फेफाळे,सुभाषराव डरांगे, लक्ष्मणराव परजणे,शिवाजीराव
गायकवाड, सोमनाथ निरगुडे,अनिलराव आचारी, ज्ञानदेव पा. कासार, किशोर परजणे,बाळासाहेब
दहे, रमेशराव बोरनारे,बाळासाहेब गायकवाड, अविनाश गायकवाड, बापू गायकवाड, बापू तिरमखे,
संभाजी शेटे, राजेंद्र ढेपले, प्रकाश शेटे, सतिश शेटे, बाबुराव मैंद, विजय आगवन, धिरज देवतरसे,
काका गायकवाड, भाऊसाहेब ढेपले, मोहिनीराज ढेपले, सुभाष बिडवे यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य,
ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close