जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव भाजीपाला मार्केटच्या वर तळीरामांचा बनला अड्डा,नजीकचे नागरिक हैराण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भाजीपाला मार्केटच्या इमारतीत वर जाणाऱ्या जिन्याला जाळीचा दरवाजा नसल्याने रात्रीच्या सुमारास या ठिकाणी तळीरामांना मोकळे रान मिळाले असून या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नजीकचे तळीराम वरील स्लॅबवर जाऊन आपले इतिकर्तव्य पूर्ण करून रिकाम्या बाटल्या नागरिकांच्या घर व परिसरात फेकून शांती भंग करीत असून या ठिकाणी नगरपरिषदेने त्वरित लोखंडी जाळ्या बसवून या तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी महत्वपूर्ण मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच केली आहे.

भाजीपाला इमारत बांधणारा ठेकेदार यांच्यात काही कारणावरून न्यायालयीन कज्जा सुरु असल्याने सदरचे काम अद्याप अर्धवट आहे.त्यात प्रमुख म्हणजे या इमारतीच्या वर जाणारा मार्ग हा लोखंडी जाळ्यांनी बंद केलेला नाही.परिणामस्वरूप या ठिकाणी वर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यास कोणताही उपाय केलेला नाही.त्यामुळे या इमारतीवरील जागा तळीरामांना आपले व्यसन वा तल्लफ पूर्ण करण्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने शहर व परिसरातील नागरिकांची भाजीपाला खरेदी विक्रीची सोय म्हणून साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी बँक रस्ता व गुरुद्वारा रस्त्याच्या मध्ये उत्तर-दक्षिण असे भाजीपाला मार्केटची उभारणी केली असून या ठिकाणी व्यापाऱ्यांना ओटे बांधून दिले आहे.या ठिकाणी ते सकाळ पासून सायंकाळपर्यंत आपली रोजी रोटी चालविण्यासाठी प्रयत्नशील रहात असतात.मात्र नगरपरिषद व संबंधित भाजीपाला इमारत बांधणारा ठेकेदार यांच्यात काही कारणावरून न्यायालयीन कज्जा सुरु असल्याने सदरचे काम अद्याप अर्धवट आहे.त्यात प्रमुख म्हणजे या इमारतीच्या वर जाणारा मार्ग हा लोखंडी जाळ्यांनी बंद केलेला नाही.परिणामस्वरूप या ठिकाणी वर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यास कोणताही उपाय केलेला नाही.त्यामुळे या इमारतीवरील जागा तळीरामांना आपले व्यसन वा तल्लफ पूर्ण करण्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे.सदर इमारतीस रखवालदार नसल्याने तेथे कोणाचेही नियंत्रण नाही.त्यामुळे या तळीरामांचे खूपच फावले आहे.आपले कामकाज आटोपल्यावर हि मंडळी आपला कचरा व रिकाम्या बाटल्या नजीकच्या नागरिकांच्या आवारात,घरावर फेकून आपले अभद्र वर्तनाचे पुरावे मागे सोडून जात असल्याने त्याचा नजीकच्या नजिकच्या नागरिकांना मनस्ताप होत आहे.म्हणून पालिकेने या तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी सदरच्या इमारतीस असलेल्या जाण्यास लोखंडी जाळ्यांचे दरवाजे बसवून या इमारतीस सुरक्षा प्रदान करावी व सदरच्या ठिकाणी शहर पोलिसांनी अधून मधून गस्त ठेवावी अशी मागणीही नगरसेवक मंदार पहाडे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close