आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ४५४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०८६ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०४ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ९३ हजार ९५३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ७५ हजार ८१२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १३.२६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार १६४ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.६७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६७ हजार ४७८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ४०८ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५८ हजार ६१४रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ४५५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे. कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व शनिवार रविवार बंद ठेवला आहे.व अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतच आपली दुकाने सुरु ठेवता येणार आहे.डेल्टा प्लसने उचल खाल्ली असून राज्य शासन हादरले आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढले आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.तर काही भागात तरुण आपले वाढदिवस भर रस्त्यात पोलिसांच्या नाकावर टिचून करून कोरोना साथीला निमंत्रण देताना दिसत आहे.त्याबाबत पोलिसानी कारवाई केली हि बाब समाधान देणारी ठरली आहे.