जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोना योद्धयांचा सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदीना निमित्त नगर जिल्हा सेनेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव व कोकमठाण शिवसेनेच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोरोना योध्याचा सन्मानपत्र,सन्मान चिन्ह,शाल देऊन सन्मान करण्यात आला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव तालुक्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत उपचारानंतर १२ हजार ०३२ रुग्ण बरे झाले आहे या लढाईत व दुसऱ्या कोरोना साथीत वैद्यकीय अधिकारी,पोलीस,महसूल अधिकारी,पंचायत समिती अधिकारी,अंगणवाडी सेविका,आशा सेविका आदींनी महत्वाची भूमिका निभावली होती.त्यांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी शिवसेनेचे नेते बाळासाहेब जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ३३४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १०० रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०२ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ८४ हजार १४८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ३६ हजार ५९२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १४.६६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ०३२ रुग्ण बरे झाले आहे या लढाईत व दुसऱ्या कोरोना साथीत वैद्यकीय अधिकारी,पोलीस,महसूल अधिकारी,पंचायत समिती अधिकारी,अंगणवाडी सेविका,आशा सेविका आदींनी महत्वाची भूमिका निभावली होती.त्यांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी शिवसेनेचे नेते बाळासाहेब जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर प्रसंगी शिवसेना नेते, बाळासाहेब जाधव,काळे सहकारी कारखनाचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम,कोकमठाण ग्रामपंचातीच्या सरपंच उषाबाई दुशिंग उपसरपंच सरपंच दीपक रोहम,सर्व ग्रामपंचायत सदस्य,कोषाध्यक्ष संजय दंडवते,उपतालुकाप्रमुख बाळासाहेब राउत,व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिकेत खोत,वैद्यकीय अधिकारी श्री.पारखे,सौ.ढाकने,कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,स्वच्छता दूत सुशांत घोड़के,कोकमठाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दिलीप गायकवाड, शहर व तालुक्यातील पत्रकार,आशा सेविका व अंगणवाड़ी सेविका आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close