सामाजिक उपक्रम
वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव शहर सेनेच्या वतीने विविध उपक्रम
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
स्व.शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तरच्या दशकात स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५५ वा वर्धापन कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने नुकताच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे.
शहर सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर तर अहमदनगर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील “कोविड योद्धा” म्हणून भूमिका बजावणाऱ्या विविध हॉस्पिटलमधील नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.अहमदनगर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माजी पदाधिकारी यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील “कोविड योद्धा” म्हणून भूमिका बजावणाऱ्या विविध हॉस्पिटलमधील नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप करण्यात आले.तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये जंतुनाशक औषध फवारणी करून सामाजिक बांधिलकी जपली व शहर शिवसेनेच्या वतीने ५५ किलो गावरान तुपाचे लाडू शिवसैनिकांना वाटण्यात आले व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,एस.टी कामगार सेना शहरप्रमुख भरत मोरे,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख,शहर संघटक,उपशहरप्रमुख,ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी,विभाग प्रमुख,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.