आरोग्य
म्युकर मायकोसिस ..असा समजून घ्या-डॉ.वाघचौरे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कधी चर्चेत नसणारी व पेंडमीक सारखी बुरशी अचानक का वाढते आहे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे व त्यामुळे भीती चे सावट लोकांमध्ये आहे.त्याबद्दलची माहिती इथे समजून घेणे इष्ठ ठरेल.
म्युकर एक प्रकारची बुरशी व मायकोसिस म्हणजे तिचे पेशींमधील संक्रमण.बुरशी वाढीस पोषक वातावरण कोणते?बुरशी वाढीसाठी तापमान १८ ते ३२ पोषक ठरते व आर्द्रता ६५ टक्क्यांपेक्षा जास्त.
बुरशी वाढीसाठी खाद्य ?
साखर, (डेक्सट्रोज),प्रोटीन,बीफ एक्सट्रॅक्ट हे बुरशी वाढी साठी चे प्रमुख खाद्य आहेत.
बुरशी चे संक्रमण कसे होते ?
बुरशी वाढीसाठी व तिचे मूळ रोवण्यासाठी जखम लागते त्याशिवाय ती वाढू शकत नाही.अगदी बारीक जखम झाली व पोषक वातावरण मिळाले की बुरशी वाढते.
बुरशी वाढीस भारतात पोषक महिने ?
साधारण बुरशी रोग वाढीसाठी ऑगस्ट ते डिसेंम्बर हे पिकांमध्ये दिसून येते तेच महिने प्राण्यांमध्ये असतात.अस्वच्छता व नको असलेला आहार,आंबट पदार्थांचे अति सेवन हेच बुरशी वाढीस पोषक ठरते.
म्युकर मायकोसिस कोणत्या लोकांमध्ये आढळला ?
डायबेटीस,अति गोड पदार्थ खाणारे,अचानक प्रोटीन सप्लिमेंट जादा घेणारे,आंबट पदार्थांचे अति सेवन करणारे,नेहमी तंबाखू ,मिस्त्री,सिगारेट घेणारे लोक ज्यांच्या मुख व नाकातून रक्त येते असे लोक,जादा नाक मुरडने,जोरात शिका करणे,नखे वाढलेले बोट नाका तोंडात जखमेस कारणीभूत होतील असे कृत्य करणे, कानात बोट घालून जोरात हलवणे इत्यादी त्यात अति रसायनांचा मारा झाला असे कोविड नंतरचे रुग्ण यांच्या मध्ये म्युकर्मयकोसिस आढळून आला आहे.
इतर वेळा ही बुरशी का वाढत नाही व सध्या का वाढते आहे ?
हानिकारक बुरशी निसर्गात खूपच कमी प्रमाणात असतात.अगदी योग्य वातावरण होताच बुरशी वाढू लागतात इतर वेळेस त्यांना वाढीस मज्जाव करणाऱ्या मित्र बुरशी जिवाणू आपल्या नाका,तोंडात,कानात,घशात पोटात असतात,अति आधुनिक रसायनांचा वापर केल्याने या मित्र जिवाणूंची व बुरशीची वसाहत आणि साखळी तुटते व हीच हानिकारक बुरशी शिरकाव करण्यासाठीची संधी शोधते आणि तिची वसाहत ती तयार करू लागते जर तिला पोषक खाद्य व वातावरण मिळाले तर.
बुरशीचे निसर्गात वाढीचे ठिकाणे ?
ओलावा असेल तिथे बुरशी वाढीस पोषक वातावरण होते,झाकलेली ओलाव्याचे जागा,पिकांमध्ये कीड जखमा करतात व त्यामुळे बुरशी तिथे आपले पाय रोवते व मग वाढते,तसेच प्राण्यांमध्ये ही तिला वाढी साठी हा निकष आहेच.जसे रासायनिक खतांचा जादा मारा केला की पिकांमध्ये बुरशी रोग वाढतात तेच माणसाच्या बाबतीत दुर्दैवाने होत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोरड पडणे म्युकर मायकोसिस फैलावस पोषक की काय ?
कोरड पडली, शरीरात पाणी कमी पडले की म्युकर मायकोसिस ला पोषक वातावरण होते व बुरशी झपाटयाने वाढू लागते.
म्युकर मायकोसिस कसा टाळता येईल ?
रक्ताचा अशुद्ध पुरवठा,कमी हिमोग्लोबीन,डायबेटीस, हाय बी.पी.वर उपचार करून सामान्य करणे व फॅटी लिवर,विटॅमिन ‘ड’ आणि विटॅमिन ‘ब’ ची कमतरता हे म्युकर मायकोसिसला सहकार्य करत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे
वरील सुचवलेले मुद्दे लक्षात घेऊन ते नियमित राहणीमान, खानपान यात बदल करून साधा नियमित आहार हेच यातून सुटका करण्याचे सूत्र आहे.
म्युकर मायकोसिस आजार संसर्गजन्य नाही.त्याची कारणे भविष्यात समोर येतील सत्य कितीवेळ गुपित राहील ? येणाऱ्या काळातील संशोधन यात अजून भर टाकणार हे नक्की.
मित्र हो,
अनेक मित्र, शेतकरी, परिचित अपरिचित अश्या अनेक लोकांनी मला हे लिहिण्यास उपकृत केले मागिल वीस वर्षांपासून माझं कीड रोग संदर्भातील संशोधन चालू आहे व मित्र जिवाणू, बुरशी शेतीसाठी लागणारे,याची कोपरगाव येथे माझी प्रयोगशाळा आहे.माझं मर रोगास कारणीभूत असलेल्या सुत्रकृमींबद्दल संशोधनाचं कार्य फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी अश्वमेध ऍग्रो मार्फत बघितले व अनुभवले आहे. औषधी वनस्पती लागवड, व प्रक्रिया यासाठीचे देखील संशोधनात्मक काम आपण केले आहे अनेक आजारांवर औषध विरहित उपचार प्रणाली आम्ही विकसित केली आहे व कोविड मध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट पेटंट नुकतेच मुंबई विद्यापीठातील संशोधक व अश्वमेध मेडिकेअरने प्रकाशित केले आहे.त्यामध्ये ‘प्रोटेक’ हे अँटीवायरल तर ‘कफेक्स’ हे दमा कमी करण्यासाठी व कफ बाहेर काढण्यासाठी आणि त्वरित लक्षणे कमी करून सुटका मिळण्यासाठी लाखो रुग्णांनी वापरून तसे सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला दिल्या आहेत.
म्युकर मायकोसिस संदर्भात अजून माहिती लागल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा–
डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे
आंतरराष्ट्रीय कीड रोग तज्ज्ञ
०२४२३-२२३५५७,७७६८००४५४५.
www.ashwamedhmart.com
www.ashwamedhagri.com
Email. ashwamedhmedicare@gmail.com