जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘तो’ रेमडीसीविर साठा दिल्लीहून नव्हे,पुण्याहून आणल्याचे उच्च न्यायालयात उघड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती चल चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली.शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला.तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही.सदर साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थान च्या रुग्णालयाला व राहता येथील सरकारी दवाखान्याला देखील देखील वाटप केले असल्याचे उघड झाले आहे.

खा.सुजय विखे यांनी विनापरवाना रेमडेसिवीर आणल्याप्रकरणी प्रधान सचिव,गृह विभाग, मुंबई यांना आदेश.१७०० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा पुण्यातून खरेदी,जिल्हाधिकारी, खासदार विखे यांना पाठीशी घालत आहे.प्रथम दर्शनी निरीक्षण न्यायालयाने नोंदवले,शिर्डी विमानतळ येथील १० एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत च्या सर्व खासजी विमानच्या चलचित्रफिती व छायाचित्रे ताब्यात घ्या-आदेश

१० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ.सुजय विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा भेसळ मुक्त,शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही,एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब देखील कुठे नाही अशा मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू,एकनाथ घोगरे,बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात खासदार डॉ.सुजय विखे यांचावर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.

आज दि. २९एप्रिल रोजी याचिकाकर्ते यांनी शपथपत्रद्वारे बातम्यांचे कात्रणे दाखल केले व त्यामधून असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले कि, जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी डॉ.सुजय विखे यांच्या बरोबर पत्रकार परिषद घेऊन १७०० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा डॉ.विखे यांनी जिल्हा रुग्णालयाला दिले.आज जिल्हाधिकारी यांनी सरकारी वकील यांच्या मार्फत २८ एप्रिल रोजीचा अहवाल न्यायालयात सादर केला.सदर अहवालात, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी विखे मेडिकल स्टोअर कडून मिळालेल्या पैशातून पुणे येतील ‘फार्मा डी’ कंपनीकडून रेमडेसीवर खरेदी केली व त्यातील काही साठा जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर यांनी विखे मेडिकल स्टोअरला दिला.उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले कि,जिल्हाधिकारी यांनी अहवालात नमूद केलेला साठा दिल्ली येथून शिर्डी येथे आला नव्हता.बातम्यांच्या कात्रणांवरून व जिल्हाधिकारी यांच्या अहवालतुन असे निदर्शनास येते की जिल्हाधिकारी,खासदार विखे यांना पाठीशी घालत आहे असे देखील निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

उच्च न्यायालयाने आजच्या आदेशामध्ये असे प्रश्न उपस्थित केला की,दिल्ली येथून शिर्डी येथे आणलेले साठा पुणे येथून खरेदी केलेल्या साठ्या व्यतिरिक्त आहे का ? डॉ.विखे यांनी विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणताना, वाटताना स्वतः काढलेले व्हिडिओ,फोटो खरे आहे का ? या सर्व गोष्टी तपासणे गरजेचे आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सर्व बाबी लक्षात घेता,न्यायालयाने असे मत नोंदवले कि,डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या मार्फत जोपर्यंत योग्य पुरावा मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी सदर प्रकरणात तपास करणे संयुक्तिक वाटत नाही. त्यावर सरकारी वकील यांनी जिल्हाधिकारी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ३ दिवसाची मुदत द्यावी अशी विनंती केली. त्यानुसार पुढील सुनावणी ३ मे रोजी २. ३० वा ठेवण्यात आली आहे.

दरम्यान उच्च न्यायालयाचे न्या.आर.व्ही घुगे व न्या. बी.यु. देबडवार यांनी प्रधान सचिव,गृह विभाग,मुंबई यांना शिर्डी विमानतळ येथील १०एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत च्या सर्व खासजी विमाने यांचे वेळ,त्यांतून वाहतूक करण्यात आलेले खोके,माल याचे चलचित्रफीत घेऊन जतन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे छायाचित्र,खासजी विमानाचे महिला गहाळ झाली,सापडत नाही असे कारणे खपवून घेतले जाणार नाही असे देखील मिश्किल टिपणी करून त्यांच्या मर्मावर बोट ठेवले आहे.काही रुग्णांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळले.

सदर प्रकरणात याचिका कर्त्यांच्या वतीने ऍड. प्रज्ञा तळेकर व ऍड.अजिंक्य काळे काम पाहात आहे तर शासनाच्या वतीने ऍड.डी.आर.काळे काम पाहात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close