कोपरगाव तालुका
कोपरगाव साठवण तलावाच्या कामाचा वेग वाढवा-आ. काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यात भविष्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील साठवण तलाव क्रमांक पाचच्या कामास खोदाई मशीनची संख्या वाढवून हा प्रश्न त्वरित निकाली काढा असा आदेश कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी गायत्री कंपनीच्या अधिकारी होशारसिंग यांना आज सकाळी समक्ष भेटीत दिले आहेत.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्यावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही.त्यावेळी रास्त्यावरील येणाऱ्या अडचणी बाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता व नाशिक जलसंपदा विभाग,उपसाभियंता कोपरगाव प्रशांत वाकचौरे यांचेशी संपर्क साधून अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले आहे.व तीन ते चार खोदाई यंत्रे,पंधराहून अधिक डंपर वाढविण्यास फर्मावले आहे.व पावसाळ्याआधी या तलावाची खोदाई पूर्ण करण्याचे निर्देश देऊन नाशिक येथील मेरी संस्थेच्या व संगमनेर येथील जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस.अहिरे याना दुपारी समक्ष बोलावून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे समक्ष पाहणी करून तलावाची दिशा व प्रत्यक्ष दिशा ठरविण्याचे काम केले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचा पाणीप्रश्न कृत्रिम रित्या निर्माण केला गेला आहे.याचा वारंवार माध्यमांनी उल्लेख करूनही त्याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले व पाणीचोरीला व पाणी गळतीला आळा घालण्याऐवजी त्यास पाठीशी घातले तसा नाशिक जलसंपदा विभागाने पत्रव्यवहार करूनही त्याला तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दाद दिली नव्हती,त्यामुळे कधीकाळी तीन आठवडे ते महिनाभर या गोदकाठच्या शहराला तुषार्त ठेवण्याचे पातक केले गेले.नगरपरीषदेने पाठपुरावा करूनही त्याला खोडा घातला गेला त्यामुळे गत अडीच वर्ष या कामाला मोठा खो बसला होता.मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अटितटीच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे हे ८२२ मतांनी विजयी झाल्यावर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व आ. काळे यांनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकून शहर विकासाला चालना देण्याचा जाहीर निर्णय घेऊन त्याला कृतीची जोड देऊन थेट महाआघाडी सरकारचे संकटमोचक खा.शरद पवार यांच्याकडे धाव घेऊन या प्रश्नी त्यांचे लक्ष वेधून घेतले व त्यातील राहु-केतू त्यांच्या लक्षात आणून देत पाच क्रमांकाच्या तलावाचे काम करण्यासाठी ना-ना करणाराऱ्या समृद्धी महामार्गाचे ठेकेदार गायत्री कंपनीचे संचालक यांना दूरध्वनी करून त्यांना काम करण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने यातील राहुकेतू उघड झाले होते.व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गत महिन्यात एक खोदाई यंत्र व नऊ डंपरद्वारे खोडाईचे काम वाजतगाजत सुरु करून झारीतील शुक्राचार्यांना मोठा झटका दिला होता.त्या नंतर त्यांनी अद्याप आपली मशिनरी वाढविली नव्हती.त्याची दखल घेऊन आगामी चार महिन्यात या तलावाचे काम पावसाळ्याआधी उरकण्याचे निर्देश दिले आहेत.त्यासाठी ज्या-ज्या अडचणी येतील त्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यांच्या समवेत कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच क्रमांकाच्या तलावाचे काम गायत्री कंपनीचे साईट व्यवस्थापक होशारसिंग,सुमित वैद्य, रुपेश साळुंके, कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,कोपरगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,कोपरगाव नगरपरीषदेचे गटनेते विरेंन बोरावके,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक मेहमूद सय्यद,मंदार पहाडे,राजेंद्र वाघचौरे,नगरपरिषद अभियंता डी. एस. वाघ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक कृष्णा आढाव, संतोष चवंडके, फकीर कुरेशी,नवाज कुरेशी,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.