जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

रांजणगाव देशमुख येथे एकाचा खून,परिसरात खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस सुमारे बावीस कि.मी.अंतरावर असलेल्या रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत महावितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या पूर्वेस हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या शेतजमिनीत रब्बी पिकास पाणी भरत असताना रात्री साडे दहाच्या सुमारास तेथील शेतकरी संजय बाळासाहेब खालकर (वय ४५) यांचा काही अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणाने तीक्ष्ण हत्यारांनी खून केल्याची घटना उघड झाल्याने रांजणगाव देशमुख परिसरात खळबळ उडाली आहे.त्यांच्या पच्छात आई,वडील,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.

रांजणगाव देशमुख येथे २००४ साली व एका वस्तीवर पोटच्या मुलाने आपल्या माता पित्यांची हत्या करून स्वतःची आत्महत्या करून जीवन संपवले होते.त्या नंतर हि सोळा वर्षानी हि भीतीदायक घटना घडली आहे.या घटनेने रांजणगाव परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्यातच मयताचे जमिनीबाबतचा वाद कोपरगाव दिवाणी न्यायालयात सुरु असल्याने त्याचा काही संबंध या घटनेशी असू शकतो का असे प्रश्न निर्माण झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, रांजणगाव देशमुख परिसरात सध्या पाऊसमान चांगले असल्याने व भूजल पातळी चांगली असल्याने मात्र महावितरण कंपनीच्या कृपेने सध्या केवळ रात्रीच विद्युत पूरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना आपले शीर हातात घेऊनच शेतीची कामे करावी लागत आहे.काल रात्री दहाच्या सुमारास तेथील शेतकरी महावितरण कंपनीच्या विद्युत उपकेंद्राच्या पूर्वेस हाकेच्या अंतरावर मयत शेतकरी संजय बाळासाहेब खालकर हे आपल्या शेतात रब्बी पिकास पाणी भरत असताना रात्री साडे दहा ते बाराच्या सुमारास कोपरगाव- संगमनेर मार्गावरून एक चारचाकी वाहन येऊन त्यातील तीन ते चार जणांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर प्रहार करून त्यांना जायबंदी केले.

दरम्यान या संबंधी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,प्रथम दर्शनी हि हत्या जवळच्या इसमानी केली असल्याचा संशय व्यक्त केला असून पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास सुरु केला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.व आरोपींना लवकरच जेरबंद करू असे आश्वासित केले आहे.

त्यांचा शेजारी काही अंतरावर मयताचे चुलतभाऊ ज्ञानेश्वर खालकर हे पाणी भरत होते.त्याना वाटले कोणी ओळखीचे असतील सदर इसम काही वेळाने परत निघून गेल्यावर घटनास्थळी त्यांची बॅटरी बराचवेळ एकाच जागी चालू असल्याने व ती जमिनीवर पडलेली असल्याने त्यांची कुठलीही हालचाल दिसत नाही म्हणून त्यांना शंका येऊन ते घटनास्थळी गेले असता त्यांना मयत संजय निचेष्ट अवस्थेत दिसून आल्यावर त्यांनी लागलीच घटनेचे गांभीर्य ओळखले व घराकडे धाव घेऊन आपल्या वस्तीवरील माणसांना हि घटना सांगितली व त्यांना घटनास्थळी येण्याची विनंती केली. त्यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने आले असता त्याना मयताच्या डोक्यावर व डाव्या कानाच्यावर दोन असे तीन वार केल्याची माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे. त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे रांजणगाव देशमुखचे सहाय्यक फौजदार नानासाहेब शेंडगे यांना भ्रमनध्वनिवरून या घटनेची कल्पना दिली त्यांनी औषधोपचार करण्यासाठी तातडीने दवाखान्यात हलविण्याचा सूचना केली.त्या नंतर राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close