जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

  …’त्या’आर्थिक घोटाळ्यातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
 
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत व्यवस्थापक आयुब बनेमिया शेख याने तब्बल ८४ लाख ४३ हजार १४६ रुपयांचा आर्थिक घोटाळा केला असून संस्थेची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असल्याचे आरोपीचा पहिला प्रयत्न फोल ठरला असल्याची नागरिकांत चर्चा आहे.

 

आरोपी आयुब शेख हा अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्नशील होता.त्याने कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजु एकूण आरोपी आयुब शेख याचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असून सदर संस्थेवर व्यवस्थापक पदावर त्याच गावातील आयुब बनेमिया शेख या इसमांची निवड केली होती.त्याने आधी मोठा विश्वास संपादन केला होता.मात्र सदर ठिकाणी संस्था चालक यांचे दैनंदिन व्यवहारात काही पळवाटा शोधून त्यातून आलेल्या ठेवी दि.०१ एप्रिल २०१६ ते दि.३१ मार्च २०२१ या दरम्यान वेळोवेळी आपल्या व आपल्या भावांच्या नावावर बनावट व कोणतेही तारण न घेता कर्ज दाखवून त्यातील मोठी रक्कम हडप केली आहे.मात्र हे करताना संस्था चालकांना हि बाब समजणार नाही याची खबरदारी घेतली होती.मात्र यात संस्थाचालक यांना काही महिन्या पूर्वी संशय आल्याने त्यांनी सदर संस्थेचे लेखा परीक्षक मनीष पटेल यांचेकडून अंतर्गत लेखा परीक्षण करून घेतले होते.त्यात हा घोटाळा निदर्शनास आला आहे.त्यांनी लेखा परीक्षक मनीष सुनील पटेल (वय-५३) यांचेकडून सदर लेखा परीक्षण केल्यावर या प्रकरणी आयुब बनेमिया शेख याने आपल्या नातेवाईंकांचे नावावर तब्बल ८४ लाख ४३ हजार १४६ रुपयांचा आर्थिक घोटाळा केला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.


   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दि.०५ मार्च रोजी रात्री उशिरा गु.क्रं.७६/२०२४ भा.द.वि.कलम ४०९,४१९,४२०,महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंधांचे संरक्षण १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान आरोपी हा अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्नशील होता.त्याने कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजु एकूण आरोपी आयुब शेख याचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे सदर आरोपी कोपरगाव तालुका पोलिसांना शरण येतो की उच्च न्यायालयात अपिलात जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुक्यासह करंजी आणि परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान फिर्यादीच्या वतीने अड्.जयंत जोशी यांनी काम पाहिले तर त्यांना अड्.व्ही.पी.ख्रिस्ते यांनी साहाय्य केले आहे.तर आरोपीच्या वतीने ऍड.बी.ए.सोनवणे यांनी काम पाहिले असल्याची माहिती हाती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close