आरोग्य
कोपरगावात रुग्ण वाढ,चिंतेचा विषय !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १४२ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०९ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी अन्य १०४ स्राव पाठवले आहे तर येथुन आलेल्या अहवालात एकही स्राव बाधित आला नाही तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेत ०४ रुग्ण बाधित आढळले आहे. आज एकूण १३जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या २० रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.शहरात व ग्रामीण भागात आज रुग्ण वाढीला आळा बसण्यासाठी प्रशासन लगाम लावण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करताना दिसत नसल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६३ हजार ४२६ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९३३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे.त्यामुळे आ.काळे यांनी उपाय योजनांसाठी नुकतीच तातडीची बैठक बोलावली होती त्यामुळे गांभीर्य वाढले आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आज ०७ रुग्ण आढळले आहे.त्यात स्वामी समर्थ एक पुरुष वय-५५ धान्यमार्केट पुरुष वय-७०,अन्नपूर्णा नगर एक पुरुष वय-१५,३९,१५, एक महिला वय-३७,कोपरगाव पुरुष वय-२२आदींचा समावेश आहे.