जाहिरात-9423439946
आरोग्य

येत्या शुक्रवारी नवीन कोविड सेंटर होणार सुरु-आश्वासन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित गंभीर रुग्णांची उपचारासाठी वर्तमान कोरोना सेंटर कमी पडत असल्याने अतिरिक्त सोया म्हणून नवीन सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालयाचे संपूर्ण काम जवळपास पूर्णत्वास आले असून कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सज्ज झाले असून शुक्रवार दि.१६ ऑक्टोबर रोजी सदर कोविड केअर सेंटर सुरु होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

मधल्या काळात कोपरगाव शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत होती.त्यामुळे सर्वच तालुका प्रशासन तणावात आले होते.त्यावर उपाययोजना करणे गरजेचे होते.कोपरगाव तालुक्यात दैनदिन वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या व अत्यवस्थ कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसलेले ऑक्सिजन बेड त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.त्यावर हि उपाययोजना करण्यात आली आहे.

मधल्या काळात कोपरगाव शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत होती.त्यामुळे सर्वच तालुका प्रशासन तणावात आले होते.त्यावर उपाययोजना करणे गरजेचे होते.कोपरगाव तालुक्यात दैनदिन वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या व अत्यवस्थ कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसलेले ऑक्सिजन बेड त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.याची दखल घेवून आ.काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित गंभीर रुग्णांची उपचारासाठी होत असलेली ससेहोलपट थांबविण्यासाठी काही दिवसांपूर्वी आपल्या विकास निधीतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला १६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन तसेच कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य दिले आहे.सर्व वैद्यकीय उपकरणे बसवून कार्यान्वित करण्यात आली आहेत.कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेवून आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन बेड,व्हेंटीलेटर,बायपॅप मशीन आदी वैद्यकीय उपकरणांसाठी आमदारनिधी खर्ची घातला असून या कोविड केअर सेंटरच्या सुरु असलेल्या कामाची आ.काळे यांनी नुकतीच पाहणी केली.सर्व उपकरणे सुरु झाल्याची खात्री करून माहिती जाणून घेत आरोग्य विभागाने अत्यंत कमी वेळात रुग्णालय उभारणी केल्याबद्दल आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे.‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’या मोहिमेचा चांगला फायदा होत आहे.कोपरगाव शहर व तालुक्यात प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यासाठी रॅपिड टेस्ट केल्या जात आहे.त्यामुळे शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत आरोग्य विभाग पोहोचला असून बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होवून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असून बाधित रुग्ण कमी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.आपण कोरोनावर यापूर्वी वर्चस्व मिळविले आहे मात्र जून महिन्यापासून टाळेबंदी उठविण्यास प्रारंभ झाला आहे.त्यात शिथिल करण्यात आलेल्या अटींमुळे रुग्ण वाढणे साहजिक आहे.मात्र अशा परिस्थितीत नागरिकांनी आजपर्यंत केलेले सहकार्य यापुढेही ठेवावे व कोरोनाला न घाबरता काळजी घ्यावी असे आवाहन आ. काळे यांनी केले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,नगरसेवक वीरेन बोरावके,मंदार पहाडे,सुनील शिलेदार,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे, डॉ. अजय गर्जे,महेमुद सय्यद,डॉ.तुषार गलांडे, डॉ.चंद्रशेखर आव्हाड,डॉ.कृष्णा फुलसुंदर,डॉ.वैशाली बदडे,डॉ.आप्पासाहेब आदिक,डॉ.संदीप वैरागळ आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close