जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जि.प.महासंघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जिल्हा परिषद महासंघाच्या कोपरगाव तालुक्याची कार्यकारिणी राज्याचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी नुकतीच जाहीर केली असून त्यात अध्यक्षपदी दिगंबर बनकर तर सचिवपदी जालिंदर पाडेकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अध्यक्ष-दिगंबर बनकर सचिव-जालिंदर पाडेकर

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते.सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात.हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात.या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी ग्रामसेवकावर असते.त्यांच्या हितरक्षणासाठी हि संघटना कार्यरत आहे.

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते.सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात.हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात.या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी ग्रामसेवकावर असते.त्या मुळें या घटकाला अनन्य साधारण महत्व आहे.यांची संघटना या घटकांच्या हितसंवर्धनचे काम करते.राज्यात जिल्हा परिषद महासंघ सर्वात शक्तिमान समजला जातो.त्या संघाची नुकतीच कोपरगाव पंचायत समिती सभागृहात बैठक राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष सुनिल नागरे,जि.प.महासंघ मानद अध्यक्ष बाळासाहेब कडू पाटील,अशोक नरसाळे,सरचिटणीस ग्रामसेवक संघटना बाळासाहेब आंबरे,निरीक्षक जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या बैठकीत खालील प्रमाणे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ शाखा कोपरगाव लोकशाही मार्गाने निवड होऊन खालील पदाधिकारी सुनील नागरे यांनी घोषित केलेले आहे.त्यात अध्यक्ष पदी दिगंबर बनकर,तर सचिवपदी जालिंदर पाडेकर,महिला उपाध्यक्ष वंदना धनवटे,महिला संघटक नीता देवगुणे,सहसंघटक उज्वला जोशी,कार्याध्यक्ष-बाळासाहेब साबळे,सहसचिव पदी-संध्या अवचिते,कोषाध्यक्ष पदी योगेश देशमुख,यांची निवड एकमताने करण्यात आली आहे.त्याची घोषणा सुनील भीमाशंकर नागरे यांनी केली आहे.खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते गुलाब देऊन सन्मान करण्यात आला आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close