जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिर्डी पोलिसांची दुसरी कारवाई,कारसह अवैध दारू जप्त

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे ते पोहेगाव रोडला लगत शिर्डी पोलिसांच्या कार्यवाहीत एक टाटा इंडिका कार सह शिर्डी पोलिसांनी ६४ हजार ९९२ रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.एका हप्त्यात हि दुसरी पोलीस कारवाई आहे.त्यामुळे अवैध दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होते व त्यातून अनेक प्रपंच धुळीला मिळतात तरुण पिढीचे आयुष्य बरबाद होते.त्यामुळे या अवैध दारू विक्रीवर बंदी आणताना आरोपी अवैध दारू विक्री करताना आढळला तर त्याला आता हद्दपार करण्याचा कायदा तीन वर्षांपूर्वी भाजप सरकारने समंत केला आहे.तरीही अद्याप ग्रामीण भागात अवैध दारू विक्री सुरू आहे.त्याला या घटनेने चाप बसण्यास मदत होणार आहे.

शिर्डी पोलीस ठाणे सध्या गतिमान झाल्याचे वाटत असून त्यांनी अवैध व्यावसायिकांच्या विरोधात धडक मोहीम सुरु केल्याचे दिसून येत असून त्यांनी गत सप्ताहात एक धाड टाकून त्या ठिकाणची अवैध दारू जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती.त्या नंतर हि दुसरी कारवाई असून या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव देर्डे रोडला काही इसम अवैध दारू वाहतूक करत असल्याची गुप्त बातमी शिर्डी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.त्यांनी त्यासाठी या परिसरात सापळा लावला होता.व ते त्या ठिकाणी वाट पाहत असताना त्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या माहिती प्रमाणे बरोबर एक पांढऱ्या रंगाच्या (एम.एच.१७ व्ही.३३०४) या टाटा कंपनीच्या इंडिका कार दिसून आली होती.व त्या मधून आरोपी गणेश जालिंदर चव्हाण (वय-२७) रा.बेट ता.कोपरगाव या आरोपीं अवैध दारू वहातुक करताना मिळून आला आहे.हि घटना काल रात्री १०.३० वाजता पोहेगाव ते देर्डे या रोड वर घडून आली आहे.त्यात पोलिसांनी ४ हजार ९९२ रूपये किंमतीच्या १८० मि.ली.च्या ९६ बाटल्या हस्तगत केल्या आहे.एकूण ६० हजार रूपये किंमतीची गाडी व ४ हजार ९९२ रुपयांची दारू असा एकूण ६ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी शिर्डी पोलिसांत गुन्हा क्रं.६९२/२०२० दारू बंदी कायदा कलम ६५ (अ) अन्वये दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे,हे.कॉ.बबन माघाडे,पोलीस नाईक बाबुराव गोडे,पो.कॉ.कैलास राठोड यांच्या पथकाने धाड टाकत जप्त केला आहे.असून सदर घटनेचा तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे शिर्डी पोलिस ठाण्याचे कर्मचारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close