जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २१६ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात १९ बाधित आढळले आहे.तर ३९ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील ०२ तर नगर येथील प्रयोग शाळेतील ०८ असे एकूण बाधित २९ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.दरम्यान आज आढळलेली रुग्ण वाढ आजपर्यंत सर्वाधिक असून ग्रामीण भागात २१ तर शहरी भागात ०८ रुग्ण वाढले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३६ हजार ६८३ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ५९७ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत दोन दिवसात तीन बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात ०८ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात २१ असे २९ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरी भागात आढळलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे-निवारा पुरुष वय-३४,इंदिरापथ पुरुष वय-५०, साईनगर पुरूष वय-४२,धनगर गल्ली पुरुष वय-३५,तेरा बंगले पुरुष वय -४३,लक्ष्मीनगर पुरुष वय-१८,संभाजी चौक पुरुष वय-४९,सुभद्रानगर महिला वय-२७,आदींचा समावेश आहे.
मंजूर पुरुष वय ३९ ५८ व महिला वय ४९ कोळगाव थंडी पुरुष वय ४० कान्हेगाव दोन महिला वय-३९,६०,टाकळी दोन पुरुष वय-४७,१५ व महिला वय-७९ वडगाव पुरुष वय-३४,शहाजापूर पुरुष वय-४०,साखरवाडी पुरुष वय-५२,मळेगाव थडी महिला वय-३१,बक्तरपूर पुरुष वय-१९,दहिगाव बोलका दोन पुरुष वय-२०,४९,खोपडी दोन पुरुष वय-२१,६५,कोकमठाण महिला वय-३०,मुर्शतपुर पुरुष वय-४२,पोहेगाव पुरूष वय-२८ आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ६४५ इतकी झाली आहे.त्यात १९४ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २९ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७६ टक्के आहे.आतापर्यंत ०७ हजार ०९७ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २८ हजार ३८८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.१७ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १४२२ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८६.४४ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण भागातील मोठ्या बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.