आरोग्य
सावळीविहिर बुद्रुक कडकडीत बंद !
जनशक्ती न्यूजसेवा
सावळीविहिर-(प्रतिनिधी)
शिर्डी जवळील सावळीविहीर बुद्रुक येथे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सावळीविहीर बुद्रुक गावात सहा दिवसाची टाळेबंदी करण्यात अली आहे. गेल्या मंगळवार दि.१५ पासून येथे मेडिकल,दवाखाने व दुधसेवा सोडून सर्व दुकाने बंद आहेत.गावातील दुकानदार व व्यापाऱ्यांनीही स्वतःहून या निर्णयाला पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत.त्यामुळे कोरोना साथ कमी होण्याची चिन्हे आहेत.
कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणून येथील कोरोना ग्राम समितीच्या सदस्यांनी निर्णय घेऊन सावळीविहीर बुद्रुक गावात सात दिवसासाठी टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व मंगळवार दि.१५ सप्टेंबर पासून येथे कडकडीत बंद पाळला जात आहे.तीन दिवसापासून येथे पूर्ण दुकाने बंद आहेत.
सावळीविहिर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत अनेक दिवसापासून कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे.त्यामुळे सावळीविहीर बु.कडकडीत बंद जाहीर केल्याचे दिसून येत आहे.हे सावळीविहीर बुद्रुक गांव नगर-मनमाड महामार्गाच्या लगत असणारे व ६ ते ७ गावांचे बाजार पेठेचे केंद्र आहे. येथे टाळेबंदीपूर्वी दर गुरुवारी आठवडे बाजार भरत होता.मात्र तो कोरोणामुळे सध्या बंद आहे.तरीही काही दिवसापासून सावळीविहीर गावात नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते व अनेक व्यवसायिक दररोज बसतात.तसेच इतर गावातील लोक येथे खरेदीसाठी येत असतात.त्यामुळे येथे नेहमी गर्दी होते.अनेकदा सुरक्षित अंतर पाळले जात नाही. मुखपट्यांचा वापर होत नाही. त्यामुळे येथे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणून येथील कोरोना ग्राम समितीच्या सदस्यांनी निर्णय घेऊन सावळीविहीर बुद्रुक गावात सात दिवसासाठी टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व मंगळवार दि.१५ सप्टेंबर पासून येथे कडकडीत बंद पाळला जात आहे.तीन दिवसापासून येथे पूर्ण दुकाने बंद आहेत.शेजारील काही गावांमध्ये कोरोनाचे काही रुग्ण वाढत आहेत.कोहकी येथे नुकताच कोरोणा बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाची दक्षता घेण्याची गरज असून टाळेबंदी व सामाजिक अंतर प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे.तसेच विनाकारण कोणी फिरू नये.जर कोणाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क करावा.सार्वजनिक उपक्रम किंवा कार्यक्रम मोठ्या संख्येने करू नयेत.असे आवाहन कोरोना ग्राम समितीचे अध्यक्ष सरपंच रूपाली संतोष आगलावे,उपसरपंच वृषाली ओमेश जपे,ग्रामविकास अधिकारी रावसाहेब खर्डे,कामगार तलाठी गायके,पोलीस पाटील सुरेखा सुरेश वाघमारे,आदींनी केले आहे.तसेच सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत एकूण सात गावे येत असून या सर्व गावांमध्ये सध्या कोरोनाच्या रॅपिड टेस्ट सुरू आहेत.येथील प्राथमिक आरोग्य केंदनिघाल्याचे सुमारे १०० रॅपिड टेस्ट करण्यात आले असून त्यामध्ये ५० व्यक्ती कोरोना बाधित निघाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर गागरे यांनी सांगितले आहे.