जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भाजप कार्यकर्त्यांची उपेक्षा पक्षाला घातक-माजी केंद्रीय राज्य मंत्री गायकवाड

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आता उपेक्षा सुरु झाली असून त्यांना आता पूर्वीसारखी वागणूक मिळत नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी कोपरगाव येथे एका भेटी दरम्यान केली आहे.माजी केंद्रीय राज्य मंत्री यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याने व त्यांनी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

भाजपचे माजी केंद्रीय राज्य मंत्री जयसिंगराव गायकवाड हे नुकतेच राष्ट्रवादीत गेल्याने व पक्ष वाढीला त्याचा त्या पक्षाने उपयोग करण्याचे ठरवलेले असल्याने नगराध्यक्ष विजय वहाडणे हे राष्ट्रवादीत तर जाणार नाही ना ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.त्यामुळे शहर व तालुक्यात उलटसुलट चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे.

माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आज कोपरगाव नगरपरिषद येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय कांबळे,श्री.धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”स्व.सूर्यभान पा. वहाडणे यांच्या सहवासातील अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.स्व.वसंतराव भागवत,माजी खा.उत्तमराव पाटील यांच्या काळात पक्षात नेते व कार्यकर्त्यांत कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.आज दुर्दैवाने तसे वातावरण राहिलेले नाही.पक्षसंघटनेतील जेष्ठ व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उपेक्षा पक्षासाठी घातक आहे याचे भान असायला हवे असे यावेळी बोलतांना जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.

माजी केंद्रीय राज्य मंत्री गायकवाड हे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दोनदा केंद्रीय राज्यमंत्री पटकावणारे व भाजपाला मराठवाड्यात स्थान मिळविण्यात अहंम भूमिका निभावणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.ते जनसंघापासून ते आजच्या भाजप पर्यंत कार्यरत होते.ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे,प्रोत्साहित करणारे नेते होत.१९९८ मध्ये पदवीधर मतदारसंघाचा आमदार असताना राज्यात ते सहकार राज्यमंत्री होते.त्यावेळी बीड जिल्ह्यातील रजनी पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडत काँग्रेसमध्ये गेल्या.त्यावेळी माजी पंतप्रधान अटलजी यांनी बीडमधून निवडणूक लढा,पार्टीचा आदेश आहे असे माना बाकी मी पाहतो असे निर्देश यांनी त्यांना दिले होते.वातावरण तसे भाजपला अनुकुल नसताना त्यावेळी विजय मिळाला.भाजप सरकार १३ महिने होते.मंत्रीमंडळ विस्तारही होऊ शकला नाही.पुढे १९९९ मोठ्या मतांनी विजयी झाले होते आणि अटलजी यांनी शेतकरी कुटुंबातील युवकास केंद्रात शिक्षण राज्यमंत्री काम करण्याची संधी दिल्याचे गौरवाने सांगत.गोपिनाथ मुंडे व प्रमोद महाजन त्यांचा गौरवाने उल्लेख करत.मात्र अलीकडील काळात त्यांची पक्षाने उपेक्षा केल्याने ते अस्वस्थ झाले होते.जिल्ह्यात व शहरात येऊनही भाजप नेतृत्व त्यांना बेदखल करत त्यामुळे ते दुखावले होते.त्याची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.ते राष्ट्रवादीत गेल्याने व पक्ष वाढीला त्याचा त्या पक्षाने उपयोग करण्याचे ठरवलेले असल्याने नगराध्यक्ष विजय वहाडणे हे राष्ट्रवादीत तर जाणार नाही ना ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close