जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोडगे हेच खरे कोरोणा योध्दा-कौतुक

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कुंभारी-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूच्या साथीत गरजू नागरिकांना आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपल्याने खऱ्या अर्थाने मेडिकल चालक हे कोरोना योध्ये ठरले असल्याचे कौतुकोद्गार कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत घुले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

विजय गोडगे हे खरे कोरोणा योध्दा असुन वंचित लोकांना आपल्या वैद्यकीय अनुभवाचा फायदाही व त्यांच्या साठी औषधे उपलब्ध करून आदर्श निर्माण केला आहे. एकीकडे कोरोणा काळात वैद्यकीय लोक आर्थिक शोषण करतात असा जो समज समाजात गेला असताना गोडगे यांचे काम हे वैद्यकीय श्रेत्रावर विश्वास वाढवणारे आहे-सरपंच घुले

कोपरगाव तालुक्यात असलेल्या कुंभारी गावात मेडीकल चालक विजय संपतराव गोडगे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोणा महामारी आजारामुळे बाजारपेठेत मंदी असताना गोरगरीब लोकांना मोफत औषधे उपलब्ध करून सामाजिक उतराई करण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल कुंभारी ग्रामपंचायतचे सरपंच प्रशात घुले उपसरपंच दिगंबर बढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

त्या प्रसंगी बोलताना प्रशात घुले म्हणाले की,”विजय गोडगे हे खरे कोरोणा योध्दा असुन वंचित लोकांना आपल्या वैद्यकीय अनुभवाचा फायदाही व त्यांच्या साठी औषधे उपलब्ध करून आदर्श निर्माण केला आहे. एकीकडे कोरोणा काळात वैद्यकीय लोक आर्थिक शोषण करतात असा जो समज समाजात गेला असताना गोडगे यांचे काम हे वैद्यकीय श्रेत्रावर विश्वास वाढवणारे असल्याचे शेवटी सांगितले आहे.

या वेळी ललित निलकंठ वंसत घुले रमन गायकवाड, सौ. किरण गायकवाड,इंदुबाई घुले,आशिष थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close