जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २८ हजार २०५ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ४२३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या ३४ तर ग्रामीण भागात १९ असे ५३ रुग्ण बाधित निघाले असून यात खाजगी प्रयोग शाळेतील ०८ बाधित रुग्ण असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे अंबिका चोक पुरुष वय अनुक्रमे 12 37 16 6 18 व महिला वय 35 30 महादेव नगर पुरुष वय-42,23 व महिला वय-26, खाटीक गल्ली महिला वय-26, इंदिरा नगर पुरुष वय-38,गांधी नगर पुरुष वय-12,मोहिनीराजनगर पुरुष वय-67,धारणगाव रोड पुरुष वय-29,महिला वय-24,बाजार तळ महिला वय-27,रेव्हेन्यू कॉलनी पुरुष वय-51, टाकळी फाटा पुरुष वय-26, महिला वय-50, श्रद्धानगरीं पुरुष वय-9,वाणी सोसायटी पुरुष वय-73,येवला रोड पुरुष वय-19,15, महिला वय-17,संजीवनी पुरुष वय-23, गांधी चौक पुरुष वय-6,मांढरे वस्ती पुरुष वय-11,बागुल वस्ती महिला वय-33,निवारा पुरुष वय-79,महावीर कॉलनी पुरुष वय-54 व महिला वय-51,गुरुद्वारा रोड पुरुष वय- 26 व महिला वय-51 आदी रुग्णांचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे कोकमठाण पुरुष वय-42,मढी पुरुष वय-60 व महिला वय अनुक्रमे-52,25,40,जेऊर कुंभारी महिला वय-55, उक्कडगाव पुरुष वय-22 व महिला वय-54,चासनळी महिला वय-42,बहादरपुर पुरुष वय-23, खिर्डी गणेश पुरुष वय-20 व महिला वय-43 वडगाव पुरुष वय-38 वेस पुरुष वय-18,महिला वय-35,13,सुरेगाव पुरुष वय-49,कोळपेवाडी पुरुष वय-50,शिंगणापूर महिला वय-20 असे एकूण 19 रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १२५३ इतकी झाली आहे.त्यात १३० रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८३ टक्के आहे.आतापर्यंत ०५ हजार २१९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २० हजार ८७६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २४.०० असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ११०० इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८७.७८ टक्के झाला आहे.दरम्यान या विक्रमी बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.