जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

एखाद्या शिक्षकाचा जीव जाण्यापूर्वीशबाना शेख यांना हटवा –जिल्हा परिषदेकडे मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या हुकुमशाही कार्यपद्धतीमुळे कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी अनेकवेळा आंदोलन करून देखील जिल्हा परिषद प्रशासन शबाना शेख यांच्या कारभारावर पांघरून घालण्याचा करीत असलेला प्रयत्न संतापजनक असून एखाद्या शिक्षकाचा जीव जाण्यापूर्वीच शबाना शेख यांना हटवा अशी मागणी पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांचेकडे केली आहे.

शबाना शेख यांची कार्यपद्धती अत्यंत चुकीची असून यापूर्वी दोन शिक्षकांनी केलेला आत्महत्येचा प्रयत्न शिक्षकांना मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीचे ज्वलंत उदाहरण आहे. एवढ्या सर्व गोष्टी होवूनही शबाना शेख यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासन कोणतीही कार्यवाही का करीत नाही? जर शबाना शेख यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही तर अजून एखाद्या शिक्षकाचा बळी जावू शकतो.

प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्यामुळे दोन शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने हे दोनही शिक्षक वाचले होते मात्र शबाना शेख यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती शबाना शेख यांना कार्यमुक्त करावे असा ठराव दि.४ नोव्हेंबर रोजी झालेल्या मासिक बैठकीमध्ये पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेवून तो ठराव मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, उपसभापती अनील कदम, जि.प सदस्या सोनाली रोहमारे,सोनाली साबळे, पंचायत समितीचे गटनेते अर्जुनराव काळे,श्रावन आसणे,मधुकर टेके, पोर्णिमा जगधने, यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची भेट घेतली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे आदी उपस्थित होते.

यावेळी सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्याशी प्रभारी गटशिक्षणाधिकारी शेख यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. जिल्हा परिषद प्रशासन कोपरगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांना पाठीशी का घालत आहे. या प्रकारामुळे शिक्षक संतप्त असून जिल्हा परिषद प्रशासनाने शेख यांच्यावर कारवाई करावी अन्यथा वेगळा विचारांचा अवलंब करावा लागेल असा सूचक इशारा पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांना दिला. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी चौकशी करून कारवाई करू असे अशी ग्वाही पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close